आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या तरुणाची पत्नीच्या डोळ्यांदेखत हत्या

या दोघांनी सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता.

Updated: Sep 15, 2018, 07:14 PM IST
आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या तरुणाची पत्नीच्या डोळ्यांदेखत हत्या title=

हैदराबाद: तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्यात प्रेमविवाह केलेल्या एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रणय कुमार असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी अमृता या तरुणीशी प्रेमविवाह केला होता. अमृता ही एका बड्या बिल्डरची मुलगी आहे. या दोघांनी सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यावेळी बराच तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे कौटुंबिक वैमनस्यातून ही हत्या झाली आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. 

अमृता गरोदर होती. प्रणय कुमार शुक्रवारी तिला घेऊन दवाखान्यात गेला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत नातलग असलेली एक महिलाही होती. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या हल्लेखोराने त्याच्या गळ्यावर कोयत्याचे दोन वार केले. यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याआधारे पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेत आहेत.