मुंबई : २०१७ या वर्षात सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेक सेलिब्रिटी ट्रोल झाले. सेलिब्रिटींनी कशा पोस्ट कराव्या ? कोणी कसे कपडे घालावे ? कसा वावर करावा ? याचे धडे 'असंख्य चाहत्यां'नी दिले. याचा त्रास अभिनेत्री मंदिरा बेदी हिलाही झाला.
पण वर्षाअखेरीस तिने अशा ट्रोलर्सना चांगलीच चपराक दिली आहे.
२०१७ वर्षात मंदिरा बेदी आपल्या बोल्ड फोटो शूटमुळे चांगलीच चर्चेत राहीली. काही दिवसांपूर्वी आपल्या इंन्स्टाग्राम, ट्विटर अकाऊंटवरून तिने स्वत:चे फोटो शेअर केले होते.
हे फोटोस अंगप्रदर्शन करणारे आहेत, उतारवयात मंदिराने असे फोटोशूट करु नये असा आक्षेप अनेकांनी घेतला. पण यांना कमेंटने उत्तर न देता अजून एक फोटो मंदिराने शेअर केला आहे.