Manipur Bus Accident: शाळेच्या बसला भीषण अपघात, 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 25 जखमी

मणिपूरमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे, बसमध्ये अनेक विद्यार्थी होते, यातले 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे

Updated: Dec 21, 2022, 04:22 PM IST
Manipur Bus Accident: शाळेच्या बसला भीषण अपघात, 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 25 जखमी title=

Manipur Bus Accident: मणिपूरमधल्या (Manipur) नोनी जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. स्कूल बस (School Bus) पलटल्याने सात विद्यार्थ्यांचा (Student) मृत्यू झाला तर 20 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. मनिपूरची राजधानी इन्फाळपासून (Imphal) 55 किलोमीटर दूरवर असलेला पहाडी भाग लोंगसाई परिसरातील कछार रोडवर ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार थम्बलून हायर सेकेंडरी स्कूलची ही बस होती. विद्यार्थ्यांच्या दोन बस नोनी जिल्ह्यातील खौपुम इथं वार्षिक कार्यक्रमासाठी जात होत्या. स्कूल बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस पलटली आणि भीषण अपघात घडला.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख
मुख्यमंत्री एन बीरेन सिंह (N.Biren Singh) यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. एसडीआरएफ, वैद्यकीय पथक आणि तिथले लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरु करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाळेच्या दोन्ही बसचा अपघात झाल्याचा दावा केला जात आहे. अपघातात 7 विद्यार्थ्यांच्या मृत्यूची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

अपघातच्या ठिकाणी किंकाळ्यांचे आवाज
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. बस पलटल्यानंतर घटनास्थळी विद्यार्थ्यांच्या किंकाळ्याचे आवाज येत होते, त्यानंतर एक धावपळ उडाली. मणिपुरमधल्या नोनी जिल्ह्यातील बिष्णुपूर-खौपुम रोडवर हा अपघात झाला. दोनही बसमध्ये विद्यार्थी होते. स्टडी टूरसाठी बस खौपूम या ठिकाणी जात होती. याचदरम्यान हा अपघात झाला. 

हे ही वाचा : Coronavirus: देशातल्या शाळा, कॉलेज, विद्यापीठांना अलर्ट नोटीस जारी

स्थानिकांनी सुरु केलं मदतकार्य
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बाचवकार्य सुरु केलं. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.