सोन्याच्या किंमतीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ

लग्नसराईचा मोसम संपत आला तरी सोन्याचे भाव काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. सोन्याच्या दरात सतत वाढच होतेय. 

Updated: Jun 8, 2018, 09:13 PM IST
सोन्याच्या किंमतीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी वाढ title=

नवी दिल्ली : लग्नसराईचा मोसम संपत आला तरी सोन्याचे भाव काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. सोन्याच्या दरात सतत वाढच होतेय. दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत ८० रुपयांची वाढ होत ते प्रति ग्रॅम ३१,९५० रुपयांवर पोहोचले. सोन्याच्या किंमतीतील वाढीसह चांदीचे दर ४१ हजार रुपये प्रति किलोवर स्थिर राहिले. 

आगामी आठवड्यांमध्ये फेडरल रिझर्व्हची बैठक तसेच अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संमेलनासारख्या प्रमुख कार्यक्रमांआधी गुंतवणूकदार सतर्क राहिले. जागतिक स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्याचे दर ०.१२ ट्क्क्यांनी कमी होत ते १,२९५. ३० डॉलर प्रति औंस राहिले तर चांदीचे दर ०.२१ टक्क्यांनी कमी होत १६.६४ डॉलर प्रति औंसवर पोहोचले. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्याने सोन्याची आयात महाग झाली ज्यामुळे सोन्याच्या दरातही वाढ झाली. 

राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर ८०-८० रुपयांनी वाढवून ते अनुक्रमे ३१,९५० आणि ३१,८०० रुपये प्रति तोळावर बंद झाले. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात २७० रुपयांची वाढ झाली होती. तर दुसरीकडे चांदीचे दर ४१ हजार प्रति किलोग्रॅमवर स्थिर झाले.