लग्न मोडलं म्हणून रागाच्या भरात मुलीला उचलून जंगलात नेलं अन्...त्या धक्कादायक कृत्याचा Video केला शेअर

Viral Video : लग्न मोडलं म्हणून रागाच्या भरात मुलगा थेट मुलीच्या पोहोचला आणि तिचं अपहरण केलं. तिला उचलून तो जंगलात घेऊन गेला आणि तिथे तिच्यासोबत त्याने...धक्कादायक म्हणजे या घटनेचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला. 

Updated: Jun 7, 2023, 02:21 PM IST
लग्न मोडलं म्हणून रागाच्या भरात मुलीला उचलून जंगलात नेलं अन्...त्या धक्कादायक कृत्याचा Video केला शेअर title=
marriage broke up man kidnapped girl took girl to the forest forcefully married video went viral on social media Trending news

Viral Video : बिहारमध्ये नववधूला सासरहून अपहरण केल्याची घटना ताजी असताना अजून एका घटनेने सगळे भयभीत झाले आहेत. बिहारमध्ये नववधूला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी दोन जण येतात आणि घरातून उचलून बाईकवरुन पळवून नेतात. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली होती. आता राजस्थानमध्ये साखरपुड्यानंतर लग्न तुटलेल्या तरुणाच्या कृत्याने धक्का बसला आहे. 

तरुणीचे अपहरण करुन जंगला नेलं...

रागाच्या भरात तरुण थेट मुलीच्या घरी पोहोचला आणि तिला उचलून घेऊन जंगलात घेतला. तिथे तिच्यासोबत त्याने बळजबरीने धक्कादायक कृत्य केले. या घटनेचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल करुन तुला बदनाम करण्याची धमकी दिली आहे. जैसलमेरमधील या तरुणाने जंगलात कचऱ्याला लाग लावून जबरदस्ती मुलीशीसोबत सात फेरे घेतले. या नराधमाने तरुणीचा नकार असतानाही तिला उचलून घेत फेरे मारले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (marriage broke up man kidnapped girl took girl to the forest forcefully married video went viral on social media Trending news)

मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तरुणीचा विनयभंग केल्यामुळे  त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ही घटना 1 जूनला घडली असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. त्यामुळे मुलीच्या पालक आणि नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

घटनेवरुन राजकारण 

या तरुणाचा फिल्मी स्टाईल व्हिडीओ केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ट्विट करत केला आहे. या व्हिडीओ शेअर करत त्यांनी काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'राजस्थानमध्ये काँग्रेसचे जंगल राज सुरू आहे,' असं म्हटलं आहे.