Indian Railway: ट्रेनच्या डब्याच्या मागे 'X' का लिहिलेलं असतं...जाणून घ्या इंटरेस्टिंग अर्थ

Indian Railway Symbol: काही जणांनी फक्त या चिन्हाकडे इंग्रजी अक्षर X म्हणून पाहिलं असेल. पण हे इंग्रजीतील X अक्षर नसून एक चिन्ह आहे. भारतीय रेल्वे नियमांनुसार प्रत्येक पॅसेंजर ट्रेनच्या मागच्या डब्ब्यावर 'X' असं चिन्ह लिहिणं अनिवार्य आहे. 

Updated: Dec 6, 2022, 03:45 PM IST
Indian Railway: ट्रेनच्या डब्याच्या मागे 'X' का लिहिलेलं असतं...जाणून घ्या इंटरेस्टिंग अर्थ  title=

Indian Railway Signs: भारतात रेल्वे वाहतूक  (indian railway) दळणवळणाचा महत्त्वाचा भाग आहे. रेल्वे वाहतुकीच्या बाबतीत अमेरिका (america) , रशिया (russia) , चीननंतर (china) चौथा क्रमांक लागतो. 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली. त्यानंतर रेल्वे देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात आपल्या प्रवासाचं जाळं विणलं.  भारतात 2020 या सालापर्यंत 67,956 किमी लांबीचे लोहमार्गाचे जाळं होते. आता यात आणखी प्रगती झाली आहे. तुम्ही कधी ना कधी ट्रेनमधून प्रवास केला असेलच. तेव्हा ट्रेनच्या प्रत्येक डब्ब्यांचं निरीक्षण केलं असेलच. या डब्ब्यांवर अनेक चिन्ह लिहिलेली असतात.  या चिन्हांना विशेष अर्थ असतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आम्ही तुम्हाला अशाच काही चिन्हांबाबत सांगणार आहोत. 

भारतात रुळावरून धावणाऱ्या प्रत्येक पॅसेंजर ट्रेनच्या शेवटच्या डब्ब्यावर मोठा 'X'असं चिन्हं लिहिलेलं असतं. या चिन्हाचा अर्थ काय असावा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. काही जणांनी फक्त या चिन्हाकडे इंग्रजी अक्षर एक्स म्हणून पाहिलं असेल. पण हे इंग्रजीतील एक्स अक्षर नसून एक चिन्ह आहे. भारतीय रेल्वे नियमांनुसार प्रत्येक पॅसेंजर ट्रेनच्या मागच्या डब्ब्यावर 'X' असं चिन्ह लिहिणं अनिवार्य आहे. याचा अर्थ हा ट्रेनचा शेवटचा डब्बा आहे. हे चिन्ह पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगात असते.

शेवटच्या डब्ब्यावर 'X'व्यतिरिक्त LV असं लिहिलेलं असतं. LV चा फुल फॉर्म 'Last Vehicle' असा आहे. हा रेल्वेचा कोड आहे. सुरक्षिततेसाठी ट्रेनच्या शेवटच्या डब्ब्यावर असं लिहिलं जातं. यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना कळतं की हा शेवटचा डब्बा आहे.  जर कधी ट्रेनच्या शेवटच्या डब्ब्यावर अशी चिन्ह दिसली नाही तर रेल्वे स्टाफ अलर्ट होतो. ट्रेनचे मागील डब्बे वेगळे झाले आहे, अशी माहिती त्यांना मिळते. 

ट्रेनच्या मागील डब्ब्यावर लाल रंगाची ब्लिंक लाइट लावलेली असते. ही लाइट ट्रॅकवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना देते. ट्रेन ठरावीक ठिकाणाहून पुढे गेल्याचं कळतं. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा ट्रॅकवर काम करता येतं. खासकरून खराब हवामान आणि धुकं पडलं असताना या लाल रंगाच्या ब्लिंक लाइटची मदत होते.