पहिल्याच प्रयत्नात UPSC क्लिअर करणाऱ्या IPS सिमला प्रसाद; बॉलिवूड आणि चित्रपटांमध्येही केला अभिनय

IPS अधिकारी असलेल्या सिमला प्रसादने आपल्या पहिल्याच प्रयत्नात युपीएससीसारखी कठीण परीक्षा पास केली.

Updated: Jul 21, 2021, 10:12 AM IST
पहिल्याच प्रयत्नात UPSC क्लिअर करणाऱ्या IPS सिमला प्रसाद; बॉलिवूड आणि चित्रपटांमध्येही केला अभिनय title=

नवी दिल्ली : IPS अधिकारी असलेल्या सिमला प्रसादने आपल्या पहिल्याच प्रयत्नात युपीएससीसारखी कठीण परीक्षा पास केली. त्यानंतर त्या आयपीएस झाल्या. त्यांना गुन्हेगार थराथरा कापतात असे म्हणतात. परंतु सौंदर्य आणि बुद्धिमान असलेल्या सिमला यांना लहानपणापासून नृत्य आणि नाटकांची आवड होती. त्यामुळे त्यांनी नागरी सेवेची जबाबदारी सांभाळत चित्रपटांमध्येही काम केले. 

Simala Prasad - A gold medallist

सिमला यांना लहानपणापासून नाटक - नृत्य करायला आवडत असे. त्याच्या शालेय जिवनात त्यांना अनेक नृत्य स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. पुढे महाविद्यालयात असताना देखील त्यांनी नृत्य - नाटकांनी व्यासपीठ गाजवलं होतं.

सिमला यांचा जन्म 8  ऑक्टोबर 1980 रोजी मध्यप्रदेशातील भोपालमध्ये झाला होता. शालेय शिक्षण त्यांना सेंट जोसेफ स्कूलमध्ये घेतले होते. समाजशास्त्रामध्ये त्यांनी पदवीत्तर शिक्षण घेऊन विद्यापीठात सुवर्ण पदक मिळवले होते.

Simala Prasad - Film debut

सिमला प्रसाद यांनी केंद्र लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली. त्यासाठी त्यांनी कोणतेही कोचिंग क्लास लावला नव्हता. त्यांनी स्वयंअध्ययन करून युपीएससीसारखी कठीण परीक्षा पास केली.

Simala Prasad never wanted to join Civil Services

सिमला म्हणतात की, त्यांनी आयपीएस अधिकारी बनायाचंय असं कधी ठरलं नव्हतं. परंतु त्यांच्या घरच्या वातावरणामुळे त्यांना युपीएससी परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली. 

दिग्दर्शक झैघम इमाम यांनी सिमला यांची भेट घेतली. त्यांचा साधेपणा आणि सौंदर्य पाहून त्यांनी सिमला यांना अलिफ चित्रपटाची स्क्रिप्ट सांगितली. तसेच त्यांना त्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. 

Simala Prasad cleared UPSC without coaching

2017 मध्ये रिलिज झालेला अलिफ चित्रपट सिमला यांचा डेब्यु चित्रपट होता. त्यांनंत सिमला यांनी नक्कश या चित्रपटातही काम केले होते.