Premanand Maharaj : मथुरा-वृंदावन येथील प्रसिद्ध प्रेमानंद महाराज यांच्या भक्तांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. प्रेमानंद महाराज यांचे मध्यरात्रीचे दर्शन बंद झाले आहे. आश्रम व्यवस्थापनाने याबाबतचे एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. अनिश्चित कालावधीसाठी प्रेमानंद महाराज यांचे मध्यरात्रीचे दर्शन बंद करण्यात आल्याचे या परीपत्रकात म्हंटले आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली देखील प्रेमानंद महाराज यांचा भक्त आहे.
मध्यरात्री 2.30 वाजता सुरु होते प्रेमानंद महाराज यांचे दर्शन
प्रेमानंद महाराज यांच्या सोशल मीडिया पेजवर देखील याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. मध्यरात्री 2.30 वाजता प्रेमानंद महाराज यांचे दर्शन सुरु होते. श्री हित राधाकेली कुंज येथे भक्त त्यांच्या दर्शनासाठी येतात. मात्र, आता हे मध्यरात्रीचे दर्शन बंद करण्यात आले आहे.
का बद करण्यात आले प्रेमानंद महाराज यांचे मध्यरात्रीचे दर्शन
मध्यरात्री 2.30 वाजता प्रेमानंद महाराज यांचे दर्शन सुरु होते. यामुळे रात्रीच्या वेळेस वाहनांची मोठी गर्दी होते. अशा स्थितीत वाहतूक नियंत्रमात ठेवताना पोलिसांचा गोंधळ उडतो. तसेच सध्या थंडीचा कडाका देखील वाढला आहे. यामुळे प्रेमानंद महाराज यांच्या प्रकृतीची विचार करता प्रेमानंद महाराज यांचे मध्यरात्रीचे दर्शन बंद करण्यात आले आहे.
प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ
प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी मध्यरात्री देखील भक्तांची मोठी रीघ लागते. प्रेमानंद महाराज हे छटिकारा रोडवरील श्री कृष्ण शरणम सोसायटी येथून त्यांच्या रामनरेती परिसरातील आश्रम श्रीभित राधाकेळी कुंज येथे जात असतात. सुमारे 2 किलोमीटरच्या या पदयात्रेत महाराजांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भक्तांची गर्दी होते. यामुले परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मध्यरात्रीचे दर्शन बंद करण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहनराव भागवत नुकतेच प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रेमानंद महाराज यांचे सत्संग ऐकले तसेच त्यांच्याशी संवाद देखील साधला. विराट कोहली देखील वृंदावनमध्ये प्रेमनंद महाराजांच्या सत्संग सोहळ्यात सहभागी झाला होता. विराटसोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका देखील होती. विराटचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.