मॉब लिंचिंग प्रकरणात आता 'ही' कठोर शिक्षा, गृहमंत्री अमित शाह यांची संसदेत मोठी घोषणा

Mob Lynching : गृह मंत्री अमित शाह यांनी तीन नव्या विधेयकांवर उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी फौजदारी न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले जात असल्याचं सांगितलं. यातला सर्वात मोठा बदल म्हणजेय आता मॉब लिंचिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या आरोपींना आता थेट फाशीची शिक्षा होणार आहे.   

राजीव कासले | Updated: Dec 20, 2023, 05:20 PM IST
मॉब लिंचिंग प्रकरणात आता 'ही' कठोर शिक्षा, गृहमंत्री अमित शाह यांची संसदेत मोठी घोषणा title=

Death Penalty For Mob Lynching: ससंदेच्या शितकालीन सत्रात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मोठी घोषणा केली आहे. मॉब लिंचिग (Mob Lynching) प्रकरणात दोषी आढळलेल्या आरोपींना आता थेट फाशीची शिक्षा सुनावली जाणार आहे. याशिवाय आयपीसी आणि फौजदारी न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदल पाहिला मिळतील असंही अमित शाह यांनी सांगितलं. संसदेत तीन नव्या विधेयकांवरच्या चर्तेत उत्तर देताना अमित शाह यांनी ही माहिती दिली. याचवेळी त्यांनी काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदम्बरम यांचं नाव घेत टोलाही लगावला.

मॉब लिंचिंग प्रकरणात फाशी
मोदी सरकार न्यायव्यवस्थेत मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. माजी गृहमंत्री पी चिंदंबरम यांनी मॉब लिंचिंग प्रकरणात मोदी सरकार काय करतंय असा प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना मॉब लिंचिंग प्रकरणात फाशीची शिक्षा देण्याची घोषणा अमित शाह यांनी केली. चिदम्बरम आमच्या विचारधारेला आणि आमच्या पक्षाला समजूच शकेल नाहीत. आमच्या पक्षाचं एकच उद्दिष्ट्य आहे त म्हणजे भारताचा विकास असं अमित शाह यांनी सांगितलं. गेल्या 70 वर्षात मागच्या सरकारने मॉब लिंचिंग प्रकरणात काय केलं हे सर्व जनतेला माहित आहे, त्यामुळे यांचे काही खासदार संसदेत एका बाजूला बसले आहेत. तर काही खासदार संसदेच्या बाहेर आहेत, अशा Double Standards मुळे त्यांच्या पक्षाची अशी अवस्था झाल्याचा टोला अमित शहा यांनी लगावला.

फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत आपल्या भाषणात गृहमंत्री अमित शाह यांनी न्याय संहिता 2023 मध्ये लिंचिंगसाठी फाशी देऊन मृत्यूची तरतूद करण्यात आल्याची माहिती अमित शाह यांनी दिली. नवीन कायदे आपल्याला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करतील, असंही त्यांनी सांगितलं. पूर्वी  CrPC मध्ये 484 विभाग होते, आता त्यात 531 विभाग असतील. 177 विभागांमध्ये बदल करण्यात आले असून 9 नवीन विभाग समाविष्ट करण्यात आले आहेत. 39 नवीन उपविभाग जोडले गेले आहेत. 44 नवीन तरतुदी जोडल्या गेल्या आहेत.

पंतप्रधान मोदी जुने डाग मिटवत आहेत, असेही अमित शहा म्हणाले. तिन्ही कायदे ब्रिटिशकालीन आहेत.  जुने कायदे दडपशाहीसाठी केले गेले होतो.  देशाला पहिलं स्थान असेल आणि जो कोणी देशाचे नुकसान करेल त्याला कधीही सोडणार नाही, राजद्रोहाचं देशद्रोहात रूपांतर करण्याचे काम करण्यात आलं असल्याचंही अमित शाह यांनी सांगितलं.