खनिज निधी अनुदानात कोट्यावधींचा गैरव्यवहार; गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर आपचा गंभीर आरोप

 गोव्यात  आप विरुद्ध भाजप असा नवा राजकीय संघर्ष पहायला मिळणार आहे.  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर खनिज निधी अनुदानात गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आले आहे. 

Updated: Feb 19, 2024, 09:16 PM IST
खनिज निधी अनुदानात कोट्यावधींचा गैरव्यवहार;  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर आपचा गंभीर आरोप  title=

Goa News : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. खनिज निधी अनुदानात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोट्यावधींचागैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आम आदमी पार्टीने हा आरोप केला आहे. या आरोपांमुळे गोव्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गोव्यात आप विरुद्ध भाजप असा नविन संघर्ष देखील पहायला मिळत आहे. 

15 कोटी रुपयांच्या अनुदानात गैर व्यवहार

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी डिस्ट्रिक्ट मिनरल फाऊंडेशन (DMF) कडून नर्सिंग इन्स्टिट्यूटला 15 कोटी रुपयांच्या अनुदानात गैर व्यवहार केल्याचा आरोप आम आदमी पार्टीने  कडून करण्यात आला आहे. आरटीआय मधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम आदमी पार्टीने हा आरोप केला आहे. आम आदमी पार्टीच्या आमदाराने विधानसभा अधिवेशनात या गैरव्यवहाराबाबत सभागृत प्रश्न उपस्थित केले. तसेच  या आरोपांच्या चौकशीची मागणी केली आहे. 

आपचे गोवा अध्यक्ष अमित पालेकर यांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर गंभीर आरोप

आपचे गोवा अध्यक्ष अमित पालेकर यांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी या आरोपांना उत्तर द्यावे आणि निधी देण्याच्या निर्णयात आपला सहभाग स्पष्ट करावा अशी मागणी अमित पालेकर यांनी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आरोप फेटाळले

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आम आदमी पार्टीने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.  निधी मंजूर करण्याचा निर्णय पारदर्शक पद्धतीने घेण्यात आला असून, या प्रक्रियेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री सावंत यांनी केला आहे. 

काय आहे DMF फंड

DMF हा एक फंड आहे जो खाण कंपन्यांनी खाणकामांमुळे प्रभावित झालेल्या समुदायांना मदत करण्यासाठी स्थापन केला आहे. हा निधी या समुदायांमधील विकास प्रकल्पांसाठी वापरला जातो. जिल्हा मिनरल फाउंडेशन (DMF) ने उत्तर गोव्यातील SAI नर्सिंग संस्थेला आरोग्य सेवा आणि शिक्षणाच्या नावाखाली 15.62 कोटी रुपये अनुदान दिले आहे. अनुदानात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.