मजूर आणि कामगारांसाठी मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

सामान्य मजूर, छोटा शेतकरी, असंघटित कामगारांसाठी दिलासादायक बातमी

Updated: Mar 26, 2020, 07:38 AM IST
मजूर आणि कामगारांसाठी मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : सामान्य मजूर, छोटा शेतकरी, असंघटित कामगारांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोनामुळे व्यवसाय थंड झाल्याने मजूर आणि कामगारांवर संकट कोसळलंय. यासाठी केंद्रातर्फे मोठे निर्णय घेण्यात येत असून मोदी सरकार १० कोटी लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार असल्याचं समजतंय.  

यासाठी दीड लाख कोटींचं पॅकेज घोषित करणार असल्याचं सांगण्यात येतंय. सरकारने तूर्त या निर्णयाची अंतिम घोषण केलेली नाही. पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्रालय आणि रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर लवकरच ही घोषणा होण्याची शक्यता आहे.

टोलवसुली स्थगित 

केंद्रीय परिवहन विभागाने एक महत्वाचा निर्णय जाहीर केलाय. या निर्णयानुसार १४ एप्रिल पर्यंत टोलवसूली स्थगित करण्यात आली आहे. 

देशभरात कोरोनाचे सावट घोंघावत असताना केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा हा निर्णय महत्वाचा मानला जातोय.

देशभरातील टोल वसुली तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

कोरोनामुळे अत्यावश्यक सेवांना अडसर निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितले आहे.