नवी दिल्ली : आपल्या देशात बेरोजगारांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाहीय. पण 1 जानेवारी 2019 पासून बरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी मोदी सरकारतर्फे महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सरकार 'वरुण मित्र' योजना सुरू करत आहे. या अंतर्गत सरकारतर्फे 3 आठवड्यांचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. हा कार्यक्रम मिनिस्ट्री ऑफ MNRE आणि NISE तर्फे चालविला जाणार आहे. याला सोलार वॉटर पम्पिंग 'वरूण मित्र' असे देखील म्हटले जाते. या योजनेमुळे कमी पगार घेणाऱ्या व्यक्तीही चांगली कमाई करु शकतात.
पुनरुत्पादित उर्जा, सौर उर्जा सहाय्यस सौर फोटोवोल्टिक, साइट फिजिब्लिटी, वॉटर टेबल, सोलर वॉटर, पम्पिंग कंपोनेंटचे वेगवेगळे प्रकार, डीटी कन्वर्टर, इन्वर्टर, बॅटरी, मोटर्स, पंप मोटर, इंस्टॉलेशन ऑफ ग्रिड एंड स्टॅंड अलोन सोलर पीवी वॉटर पम्पिंग सिस्टिम बद्दल लोकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
याशिवाय सोलार पीवी वॉटर पम्पिंग सिस्टिमची सेफ्टी प्रॅक्टीस, ऑपरेशन अॅण्ड मेंटनंस, टेस्टिंग अॅण्ड कमिशनिंगची माहिती देखील माहिती देण्यात येणार आहे.
याचे प्रशिक्षण 1 ते 19 जानेवारी दरम्यान होणार असून यामध्ये एकूण 120 तासाचे प्रशिक्षण होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला 28 डिसेंबर पर्यंत अर्ज करावा लागणार आहे. या कार्यक्रमाचे प्रशिक्षण वर्ग एखाद्या बंद खोलीत होण्यापेक्षा प्रत्यक्ष फिल्ड आणि इंडस्ट्रींना भेट देऊन होणार आहेत.
याचे प्रशिक्षण मोफत मिळणार आहे. जर तुम्हाला प्रशिक्षणा दरम्यान हॉस्टेलमध्ये राहायचे असल्याचे 600 रुपये प्रति दिन द्यावे लागतील. हे प्रशिक्षण लेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, मॅकेनिकल, इंजीनीयर, सोलर इंटरप्रेन्यूयर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे.