Morbi Election Result : मोरबी दुर्घटनेत जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवणाऱ्या 'या' नेत्याला जनतेचा आशीर्वाद!

Morbi Election Result: मच्छू नदीवर बांधलेला पूल ऑक्टोबर महिन्यात तुटला. या अपघातात 130 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातानंतर लगेचच कांतीलाल अमृतिया यांनी नदीत उडी मारून अनेकांचे प्राण वाचवले. 

Updated: Dec 8, 2022, 12:37 PM IST
Morbi Election Result : मोरबी दुर्घटनेत जीव धोक्यात घालून लोकांचा जीव वाचवणाऱ्या 'या' नेत्याला जनतेचा आशीर्वाद! title=
Morbi Election Result Morby Bridge disaster

GujaratElectionResult :  गुजरात विधानसभा निवडणुका (Gujarat Election 2022) जाहीर होण्यापूर्वी मोरबी पूल दूर्घटनेने (Morby Bridge disaster) संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या दुर्घटनेत 143 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या वेळी एक व्यक्ती नदीत उडी मारून लोकांचा जीव वाचवला. ज्यांनी अनेकांचे जीव वाचवले ते दुसरे कोणी नसून गुजरातचे माजी आमदार कांतीलाल अमृतिया होते. त्यानंतर कांतीलाल हे सोशल मीडिया प्रचंड व्हायरल झाले. दरम्यान मोरबी दुर्घटनेत अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या भाजप उमेदवाराला जनतेनं आशीर्वाद दिलं असल्याचे दिसून येत आहे. कारण मोरबी येथील भाजपचे उमेदवार कांतीलाल अमृतिया (Kantilal Amrutiya) दहा हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. 

गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणीला (Gujarat Election Result 2022) आज (8 डिसेंबर) सकाळपासून सुरू झाली.  या निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे आणि हळूहळू इतिहास रचण्याच्या जवळ येत आहे. तर दुसरीकडे राज्यात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. तर आम आदमी पक्षाला 10 टक्क्यांहून अधिक मते मिळताना दिसत आहेत. तर दुसरीकडे ऑक्टोबर महिन्यात मच्छू नदीवरील पूल कोसळला  (Morby Bridge disaster)  होता. या अपघातात 130 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातानंतर लगेचच गुजरातचे आमदार कांतीलाल अमृतिया यांनी नदीत उडी मारून अनेकांचे प्राण वाचवले.

सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडिओ समोर आले होते. ज्यामध्ये ते लाईफ ट्यूब घालून अनेकांचा जीव वाचवताना दिसून आले. या घटनेतील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पूल कोसळल्यानंतर लगेचच अमृतियाने नदीत उडी मारून अनेकांना वाचवले होते. यानंतर पक्षाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत मोरबीतून तिकीट दिले होते.

वाचा : गुजरातमध्ये कोण मारणार बाजी? 

आज (8 डिसेंबर) सकाळी 10.30 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मोरबी विधानसभा मतदारसंघातून (Morbi Assembly Voters) भाजपचे उमेदवार कांतीलाल अमृतिया 10,156 मतांनी आघाडीवर आहेत. त्याचवेळी भाजप 150 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस केवळ 16 जागांवर आघाडीवर आहे. तर आप सहा जागांवर आघाडीवर आहे. दोन जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत.

मोरबी दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. 130 हून अधिक मृत्यूंचा समावेश असलेल्या या मोठ्या निष्काळजीपणाबाबत अनेक गोष्टी आता समोर आल्या आहेत. या पुलाची क्षमता 100-150 लोकांची असल्याचे सांगण्यात येत होते. अपघाताच्या दिवशी या पुलावर क्षमतेपेक्षा 5 पट अधिक लोक प्रवास करत होते. यानंतर पूल तुटून अनेकांना जीव गमवावा लागला. गुजरात सरकारनेही अपघातातील मृतांना भरपाई जाहीर केली होती.