Daughter Date 100 Guys: आई वडिल आपल्या मुलीची खूप काळजी घेत असतात. त्यामुळे लग्नाआधी आपली मुलगी कोणत्या मुलाला डेट करत असल्याचे त्यांना सहसा रुचत नाही. आपल्या मुलीसोबत काहीतरी गैरवर्तन होईल, याची त्यांना सतत काळजी असते. पण आता जमाना हळुहळू बदलू लागला आहे. मुली आपल्या बॉयफ्रेण्डसोबतच्या डेटबद्दल खुलेपणाने आईशी बोलू लागल्या आहेत. इथपर्यंत ऐकायला सर्व ठिक वाटतंय. पण याही पुढे जाऊन एका आईने आपल्या मुलीने 100 तरुणांसोबत डेटला जावे अशी इच्छा व्यक्त केली. ऐकून आश्चर्य वाटेल पण अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे.
केवळ इच्छा व्यक्त करुन ही आई थांबली नाही तर तिने आपल्या मुलीला खर्चासाठी 40 हजार रुपयेदेखील दिले. यामागे घडलेले कारण समजल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. अशा आईबद्दल कधीच ऐकलं नव्हत असं तुम्ही म्हणाल.
ब्रिटनमधील रहिवासी असलेल्या एलिस कॅरोलिनने टिकटॉकवर यासंदर्भात खुलासा केला आहे. कॅरोलिन हेअर ट्यूटोरियल व्हिडिओ शेअर करते आणि अनेकदा तिचे व्हिडिओ खूप उपयुक्त असतात. पण काही दिवसांपूर्वी तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित आणि तिच्या कुटुंबाशी संबंधित रहस्ये शेअर करेल.
आईने तिच्या बहिणीला 100 पुरुषांसोबत डेटवर जाण्यासाठी प्रोत्साहित केले, असे तिने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितले. यासाठी आईने तिला 500 डॉलर्सही दिले. गरज भासल्यास आणखी माग असेही सांगितले. ही क्लिप सोशल मीडियात खूप व्हायरल झाली. पाहता पाहता या व्हिडीओला 80 लाखांहून अधिक व्ह्यू आले आहेत.
कॅरोलिनने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती कुटुंबासोबत सेलिब्रेशन करताना दिसत आहे. तिच्या बहिणीने 100 डेट पूर्ण केल्यावर हा सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी कुटुंबाने 2 केक ऑर्डर केले. पहिल्यावर 100 मेणबत्त्या होत्या, तर दुसऱ्यावर 'YAY' असे लिहिले.
जेव्हा तुमची आई तुमच्या बहिणीला लग्नापूर्वी 100 वेगवेगळ्या मुलांसोबत 100 डेटवर जाण्यासाठी $500 देते, असे कॅप्शनदेखील लिहिले. या व्हिडीओमध्ये कॅरोलिननेतिच्या बहिणीचा चेहरा दाखवला नाही. तिचे नावही गुप्त ठेवण्यात आले होते. पण बहिणीला तिच्या फोनवर तिने डेट केलेल्या लोकांची यादी स्क्रोल करताना दाखवली.
माझ्या बहिणीला 100 पुरुषांसोबत डेट करायला अनेक वर्षे लागली. पण काळात तिने आईने दिलेल्या पैशांपैकी एकही रुपया खर्च केला नाही. संपूर्ण 500 डॉलर्स तिने वाचवले, असे एलिसने सांगितले. आईने असे का केले? याबद्दलही ती बोलली. मुलीने सर्व प्रकारच्या पुरुषांना भेटावे, त्यांना जाणून घ्यावे अशी आईची इच्छा होती. यामुळे लग्नानंतर पुरुषांबद्दल तिच्या मनात भीती निर्माण होणार नाही, असे आईला वाटत होते.
टिकटॉकवर हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तिच्या आईचे कौतुक केले जात आहे. तिच्याकडे बरेच पर्याय आहेत, हे आईने लेकीला दाखवून दिल्याची कमेंट एका युजरने केली. आई मुलीला डेटवर जाण्याचे पैसे देत होती कारण कुटुंब मॉर्डन असून डेटींगला ते नॉर्मल समजतात, असे दुसऱ्या युजरने लिहिले.
दरम्यान माझ्या आईने मला 100 बॉयफ्रेण्ड बनविण्याऐवजी डेट करण्याला प्रोत्साहन दिले. हे काही वेगळ आहे असं मला वाटत नाही. पण यूटामध्ये राहणे आणि मॉर्डन मित्रांसोबच डेट करणे हे खूपच सर्वसाधारण असल्याचे ती मुलगी सांगते.