जीम पार्टनरने घरात घुसून केली बिल्डरच्या पत्नीची हत्या; नंतर पळत घरी गेला अन्...

Delhi Crime : दिल्लीत घडलेल्या या हत्यांकाडांने एकच खळबळ उडाली आहे.महिलेच्या हत्येनंतर आरोपीने स्वतःच्या घरात पळ काढला होता.पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 28, 2023, 01:21 PM IST
जीम पार्टनरने घरात घुसून केली बिल्डरच्या पत्नीची हत्या; नंतर पळत घरी गेला अन्... title=

Delhi Crime : देशाची राजधानी दिल्लीतून (Delhi News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजधानी दिल्लीत महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून आरोपीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. पोलीस (Delhi Police) तपासात आरोपी आणि महिला एकमेकांना आधीपासूनच ओळखत असल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या महिलेला तीन मुले आहेत. गोळी लागल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दिल्लीच्या डाबरी भागात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. 23 वर्षीय तरुणाने 42 वर्षीय महिलेची गोळ्या झाडून हत्या केली. महिलेची हत्या केल्यानंतर तेथून पळ काढला होता. त्यानंतर काही वेळाने तरुणाने स्वत:वरच गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या गोळीबाराच्या घटनेनं परिसरात एकच गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. महिलेच्या हत्येनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीची ओळख पटली. पोलिसांचे एक पथक आरोपीच्या घरी पोहोचले असता तोही संशयास्पद अवस्थेत मृतावस्थेत आढळून आला होता.

रेणू गोयल असे या महिलेचे नाव आहे तर आशिष असे मृत तरुणाचे नाव आहे. मृत रेणूचा पती बांधकाम व्यावसायिक आहे. आशिष आणि रेणू हे मित्र असल्याचे सांगितले जात आहे. दोघेही एकत्र जिमला जायचे. आशिषने रेणूच्या डोक्याजवळ बंदूक ठेवून गोळी चालवली होती. पोलिसांनी सांगितले की, या घटनेनंतर आरोपी आशिष त्याच्या घरी गेला आणि स्वतःवर गोळी झाडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री 8.45 च्या सुमारास डाबरी पोलीस ठाण्याला खुनाच्या घटनेची माहिती मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता रेणू नावाच्या महिलेची गोळ्या झाडून हत्या झाल्याचे समोर आले. रेणूची घराजवळच हत्या करण्यात आली होती.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की एका तरुणाने रेणूला गोळी मारली आणि पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता तरुणाची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तरुणाचे घर गाठलं. मात्र घराच्या छतावर आशिषने स्वतःवरच गोळी झाडत आत्महत्या केली होती. पोलिसांनी सांगितले की, आशिष आणि रेणू एकमेकांना ओळखत होते आणि दोघेही एकाच जीममध्ये जात होते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x