रक्षाबंधनापूर्वी मध्य प्रदेश सरकारने 'लाडक्या बहिणींना' खास भेट दिली आहे. 'लाडली बहना' योजनेच्या महिला लाभार्थ्यांना आता 450 रुपयांना गॅस सिलेंडर मिळणार आहे. मध्य प्रदेशमध्ये सध्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 848 रुपये आहे. आता लाडक्या बहिणींना सरकारकडून केवळ 450 रुपयांना गॅस सिलेंडर मिळणार आहे. एका गॅस सिलेंडरमागे 399 रुपये खर्च राज्य सरकार करणार आहे. यासाठी सरकारला सुमारे 160 कोटी रुपये खर्च येणार आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.
लाडली ब्राह्मण योजना
माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही लाडली ब्राह्मण योजना सुरु केली होती. 2023 मधील भाजपच्या विक्रमी विजयानंतर ही योजना महत्त्वाची मानली जात आहे. मध्य प्रदेश सरकारकडून 'लाडली ब्राह्मण योजने'मधून राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात 1250 रुपये जमा केले जातात. आता रक्षाबंधनामुळे 1 ऑगस्टपासून राज्य सरकारकडून अतिरिक्त 250 रुपये देण्यात येणार आहे.
आज मंत्रालय में राष्ट्रीय गीत वंदे मातरम् गायन के साथ मंत्री परिषद की बैठक प्रारंभ हुई।#DrMohanYadav#CMMadhyaPradesh pic.twitter.com/TuQr2ENYoQ
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51)
अंगणवाडी सेविकांना विमा संरक्षण
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांसाठी देखील एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सक्षम अंगणवाडी पोषण योजनेंतर्गत, अंगणवाडी सेविकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत समाविष्ट केले जाईल. त्याचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे. राज्यातील 57 हजार 324 अंगणवाडी सेविकांना याचा लाभ मिळणार आहे.
सरकार पाहणार रस्ते योजनेचे काम
मंत्रिमंडळ बैठकीत आज प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत अपूर्ण राहिलेले रस्ते आता राज्य सरकार बांधणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 56 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये अॅलोपॅथी रुग्णालयात सर्व उपचार पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी आयुष शाखा स्थापन केली जाणार आहे.