Reliance AGM 2024 मध्ये मोठी घोषणा करत अंबानींचं एक पाऊल पुढे! आता थेट Apple, Google ला टक्कर

रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा सामन्यांसाठी भरघोस प्लान आणला आहे. यामध्ये त्यांनी Jio AI Cloud लाँच केलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 29, 2024, 04:50 PM IST
Reliance AGM 2024 मध्ये मोठी घोषणा करत अंबानींचं एक पाऊल पुढे! आता थेट Apple, Google ला टक्कर title=

Reliance AGM 2024 ची सुरुवात रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली. Jio AI Cloud लाँच केलं आहे. जेथे युझर्स आपला डेटा अपलोड करु शकतात. यामध्ये फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट्स स्टोर केले जाऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे हे अतिशय माफक दरात मिळणार आहे. Reliance AGM 2024मध्ये मुकेश अंबानींनी लाँच केलं Jio AI Cloud. यामध्ये 100GB डेटा फ्री मिळणार आहे. 

मुकेश अंबानींनी Jio AI Cloud लाँच केलेल्या Jio AI Cloud च्या वेलकम ऑफरची सुरुवात दिवाळीपासून होणार आहे. ज्या अंतर्गत Jio युझर्स 100GB Free Cloud स्टोरेज मिळणार आहे. प्रत्येक एका भारतीयाला प्रत्येक डिवाइसवर AI सर्विस आणि क्लाऊड स्टोरेजची सुविधा मिळणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, हा एक सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे. 

प्रत्येक भारतीयापर्यंत AI पोहोचवणे 

मुकेश अंबानीने सांगितले की, AI ला प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचवणे हा एकमेव उद्देश आहे. प्रत्येक वयाच्या व्यक्तीपर्यंत AI चे सर्व फिचर्स अंबानींना पोहोचवायचे आहे. याकरिता त्यांनी सांगितले की, कंपनीचे कनेक्टेड इंटेलीजन्सचा वापर प्रत्येकाला अगदी सहज करता येणार आहे. ज्यामध्ये AI सर्विस आणि क्लाऊड स्टोरेजचा समावेश आहे. 

(हे पण वाचा - मुकेश अंबानी यांची फक्त 15 मिनिटांत 53 हजार कोटींची छप्परफाड कमाई; असं केल तरी काय?) 

 

नवीन AI सर्विसबाबत 

मुकेश अंबानी यांनी याशिवाय इतर AI सर्विसबाबत सांगितले. ज्यामध्ये AI Doctor आणि AI Teacher चा फायदा अनेक लोक आपल्या शिक्षणामध्ये करत आहेत. 

Reliamce AGM 2024 मध्ये मुकेश अंबानी यांनी 2G मुक्त भारताचा नारा दिला आहे. Jio ने 50 टक्के युझर्सला 3G शी जोडले आहे. पुढे त्या म्हणाले की, देशातील प्रत्येक काना कोपऱ्यात रिलायन्सचे जिओ पोहोचले आहे. देशातील सर्वात मोठे पेटेंट होल्डर बनले आहेत. 

Jio कडे 5G, 6G मध्ये 350 हून अधिक पेटेंट आहे. कंपनीने 5G फोन सामान्यांपर्यंत पोहोचवला आहे. 2 वर्षांत Jio चे 13 कोटी ग्राहक 5G शी जोडले गेले आहेत. पुढे त्यांनी सांगितले की, 2G ग्राहक देखील आता 5G मध्ये अपग्रेड होत आहेत.