RIL AGM: उद्योग क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा मोठा दबदबा आहे. मुकेश अंबानी यांनी नवा इतिहास रचला आहे. मुकेश अंबानी यांची फक्त 15 मिनिटांत 53 हजार कोटींची छप्परफाड कमाई केली आहे. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा मालामाल झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM अर्थात वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु असतानाच शेअर्सने मोठी उसळी घेतली.
रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. 47 व्या एजीएममध्ये 35 लाख शेअरहोल्डर्सला मुकेश अंबानी यांनी संबोधीत केले. यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर वधारले. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये एक दिवस 53 हजार कोटींपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 2 वाजता रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM सुरु झाली. तेव्हापासूनच कंपनीच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी 2.64 टक्क्यांच्या वाढीसह 3074.80 रुपयांचा दिवसाचा उच्चांक गाठला. तर, सकाळपासून कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वाढ झाली होती. सकाळी कंपनीचे शेअर्सनी BSE वर 3014.95 रुपयांवर दमदार ओपनींग केली. दुपारी 2:35 वाजता कंपनीचे शेअर्स 1.84 टक्क्यांच्या वाढीसह 3050.95 रुपयांवर पोहचले आहेत. हेच शेअर काल 2,995.75 रुपयांवर बंद झाले होते.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. मागील आकडेवारीवर नजर टाकल्यास कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 26 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या एजीएममध्ये कंपनीचे शेअर्स एक टक्क्यांहून अधिक घसरणीसह 2442.55 रुपयांवर बंद झाले होते. आता मात्र, या शेअर्समध्ये 572.4 रुपयांची वाढ झाली आहे. तज्ञांच्या मते, कंपनीच्या शेअर्स आणखी वाढणार आहेत.
AGM सुरु होताच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या वाढीसोबतच कंपनीच्या मार्केट कॅपमध्येही वाढ झाली आहे. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 53 हजार कोटी रुपयांची वाढ झालेय. आकडेवारीवर नजर टाकली असता एका दिवसापूर्वी कंपनीचे मार्केट कॅप 20,27,100.67 कोटी इतके होते. कंपनीच्या शेअर्सने उच्चांक गाठला आहे. कंपनीते शेअर्स 20,80,590.55 कोटी रुपयांवर पोहोचले आहेत. एजीएम सुरू झाल्यानंतर कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 53,489.88 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. अवघ्या 15 मिनीटांत ही उसळी पहायला मिळाली.
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
TAN
(20 ov) 154/7
|
VS |
BRN
157/4(16.2 ov)
|
Bahrain beat Tanzania by 6 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.