मुंबई : 2021 या वर्षात अनेक शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. या वर्षी दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिमध्ये असलेल्या एका शेअरने बंपर कमाई केली आहे. टिन्ना रबर अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड असे या शेअरचे नाव आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना एका वर्षात जवळपास 10 पट अधिक परतावा मिळवला आहे. या वर्षी जानेवारीपासून शेअरमध्ये 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गेल्या एका वर्षातील टिन्ना रबर आणि इन्फ्रास्ट्रक्चर शेअरचा प्रवास पाहता, गुंतवणूकदारांना 920 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. म्हणजेच वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवणाऱ्याचे मूल्य आज सुमारे 10 लाख रुपये झाले आहे. एका वर्षापूर्वी, शेअरची किंमत 34 रुपये होती, जी 25 एप्रिल 2022 रोजी 333 रुपयांवर पोहोचली.
डॉली खन्ना यांनी डिसेंबर 2021 च्या तिमाहीत पहिल्यांदा टिन्ना रबर आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स खरेदी केले होते. BSE वरील मार्च 2022 च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, डॉली खन्ना यांच्याकडे कंपनीमध्ये 1.60 टक्के (1,37,057 इक्विटी शेअर्स) हिस्सा आहे. यापूर्वी, डिसेंबर 2021 च्या तिमाहीत त्यांच्याकडे 1.67 टक्के शेअर्स होते.