Multibagger stock : फक्त 2 रुपयांचा शेअर पोहचला तब्बल 2000 वर; गुंतवणूकदार मालामाल

Multibagger stock : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून दमदार परतावा मिळावा अनेकांची इच्छा असते. अनेक गुंतवणूकदारांना अशाच एका शेअरने मागील 5 वर्षांत 1000 टक्क्यांचा रिटर्न दिला. फक्त 2 रुपयांचा हा शेअर आता 2000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे.

Updated: Aug 1, 2022, 11:45 AM IST
Multibagger stock : फक्त 2 रुपयांचा शेअर पोहचला तब्बल 2000 वर; गुंतवणूकदार मालामाल title=

मुंबई : शेअर बाजारात पैसा गुंतवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की ज्या कंपनीचा शेअर विकत घेतला आहे त्यातून प्रचंड परतावा मिळावा. म्हणूनच गुंतवणूकदार जबरदस्त तेजी नोंदवू शकतील अशा पेनी स्टॉक्सवर लक्ष ठेवून असतात. ज्यांची किंमत अत्यंत कमी असते आणि अगदी थोड्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळवू  शकता. असं असलं तरी, कोणत्या वेळी कोणता शेअर किती लक्ष्यासाठी विकत घ्यावा. शेअर बाजाराची चाल कशी असेल याचा अंदाज लावणं कठीण असतं. 

आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअर बद्दल सांगणार आहोत. ज्याची किंमत फक्त 2 रुपये होती. आणि आता हा शेअर 2 हजार रुपयांच्या जवळ पोहचला आहे. या शेअरने आतापर्यंत 95 हजारपटींचा परतावा शेअरधारकांना दिला आहे.

हा म्हणजेच शेअर दीपक नाइट्राइट होय.1995 ला BSE च्या यादीत या शेअरचा समावेश झाला.  त्याच वेळी शेअर बाजार तज्ज्ञांनी या शेअरमध्ये भविष्यात चांगल्या तेजीची शक्यता वर्तवली होती.

1 लाख रुपयांची गुंतवणूक आणि 9 कोटी रुपयांचा फायदा

 

दीपक नाइट्राइटचा शेअर 10 ऑगस्ट 2001 ला बीएसईवर 1.96 रुपयांना ट्रेड करीत होता. 29 जुलै 2022 ला हा शेअर 1915 वर येऊन थांबला. जर तुम्ही दीपक नाइट्राइटच्या शेअरमध्ये 10 ऑगस्ट 2001 ला 1 लाख रुपये गुंतवले असते आणि तर त्याची किंमत 9.75 कोटी रुपये इतकी झाली असती. 

या शेअरने मागच्या 5 वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना 1000 पटींचा रिटर्न दिला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3020 रुपये आहे. या शेअरचा 52 आठवड्यांच्या निच्चांक 1681 रुपये आहे. 

शेअर मार्केट तज्ज्ञ या शेअरमध्ये आणखी तेजीचा अंदाज व्यक्त करीत आहेत. 

विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षक करणारा शेअर

 

विदेशी गुंतवणूकदार जेव्हा शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेत होते. त्या दिवसांमध्येही दीपक नाइट्राइटच्या शेअरमध्ये गुंतवणूक वाढत होती. 31 मार्चपर्यंत या शेअरमध्ये 8.76 टक्के विदेशी गुंतवणूकदारांचा वाटा होता तर जुलैमध्ये हा आकडा 9.07 इतका झाला होता.

10 वर्षांत 1 लाखांच्या गुंतवणूकीतून 1 कोटींचा परतावा

 

14 सप्टेंबर 2012 ला दीपक नाइट्राइटच्या शेअरची किंमत बाँबे स्टॉक एक्सचेंजमध्ये 17.19 रुपये इतकी होती. या कंपनीच्या शेअरने मागच्या 10 वर्षांत 10,000 पटींपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. 

एखाद्या गुंतवणूकदाराने दीपक नाइट्राइटच्या शेअरमध्ये 10 वर्षापूर्वी 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर तर आता त्याची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती.