Mutual Funds NFO: 500 रूपयांपासून गुंतवणूकीची संधी, मिळतील अफलातून रिटर्न्स

Mutual Fund NFO: एक नवा एनएफओ (NFO) गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. म्यूच्युअल फंड एनएफओ (NFO) हा एक त्यातला चांगला पर्याय आहे. 

Updated: Nov 26, 2022, 08:03 PM IST
Mutual Funds NFO: 500 रूपयांपासून गुंतवणूकीची संधी, मिळतील अफलातून रिटर्न्स  title=

Mutual Fund NFO: म्यूच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. म्यूच्युअल फंड यात अनेक वैविधता असते. त्यामुळे तुम्हाला यात मिडकॅप, स्मोलकॅप (smallcap) सारखे अनेक पर्याय उपलब्ध होतात. तेव्हा तुम्हाला चांगल्या रिटर्न्ससोबतच कमीत कमी जोखीम मिळते. सध्या तुम्ही अशाच काही म्यूच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. तेव्हा जाणून घेऊया सध्याचे ट्रेण्ड्स काय सांगतात. सध्या एनएफओ (NFO) हा म्यूच्युअल फंड (Mutual Fund Investment) गुंतवणूकीसाठीचा चांगला पर्याय आहे. एक नवा एनएफओ (NFO) गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. म्यूच्युअल फंड एनएफओ (NFO) हा एक त्यातला चांगला पर्याय आहे. आदित्य बिर्ला सन लाईफ म्यूच्युअल फंडच्या (Aditya Birla Sun Life Insurance) नव्या डेट फंडमध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. (mutual fund nfo invest from rupees 500 in this open ended nfo and gain returns)

एबीएसएल (ABSL) म्युच्युअल फंड आदित्य बिर्ला सन लाइफ क्रिसिल IBX 60:40 SDL+ AAA PSU APR 2026 इंडेक्स फंड (Aditya Birla Sun Life Crisil IBX 60:40 SDL+AAA PSU APR 2026 Index Fund) कडून या नव्या योजनेची सदस्यता 24 नोव्हेंबर रोजी खुली झाली आहे. या एनएफओ (NFO) मध्ये 1 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील. ही एक ओपन एंडेड (open ended) योजना आहे. म्हणजेच गुंतवणूकदाराला हवे तेव्हा पैसे काढता येतील. ओपन एंडेड योजनेचा फायदा गुंतवणूकदारांना होतो. त्यामुळे यातूनही तुम्ही सुरक्षित गुंतवणूक करू शकाता. 

हेही वाचा - पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना

₹ 500 पासून गुंतवणूक 

ABSL म्युच्युअल फंडानं दिलेल्या माहितीनुसार, या फंडातील गुंतवणूक तुम्ही एनएफओ (NFO) मध्ये किमान रूपये 500 आणि त्यानंतर रूपये 1 च्या पटीने सुरू करू शकता. ही योजना अत्यंत परिपक्व आहे आणि दीर्घ काळासाठी आहे. या ओपन - एंडेड स्किममध्ये झीरो एक्झिट लोड आहे. यामध्ये लॉक - इन कालावधी नाही. या योजनेचे निधी व्यवस्थापक भूपेश भामेटा आहेत. त्याचा बेंचमार्क निर्देशांक CRISIL IBX 60:40 SDL + AAA PSU एप्रिल 2026 असा आहे.

म्युच्युअल फंड हाऊसच्या मते योजनेचे उद्दिष्ट CRISIL IBX 60:40 SDL + AAA PSU इंडेक्सच्या सिक्युरिटीजच्या एकूण परताव्याच्या अनुषंगाने परतावा निर्माण करणे आहे. मात्र योजनेत अशी कोणतीही हमी नाही. हा टार्गेट मॅच्युरिटी फंड असल्याने त्याची पूर्व-निर्धारित प्री-मॅच्युरिटी तारीख असते. जेणेकरून गुंतवणूकदारांना त्यांच्या दीर्घकालीन उद्दिष्टांनुसार गुंतवणूक करणे सोपे जाईल. यामध्ये गुंतवणूकदारांना 4 वर्षांचा इंडेक्सेशन लाभ मिळेल. 

(Disclaimer: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)