मोदींच्या गावातच हागणदारी मुक्तीचे तीन-तेरा

काही महिलांनी सांगितलं की, शौचालय बनवण्यासाठी आम्ही मेहनत घेतली, खर्च केला, पण आम्हाला पैसे देण्यात आले नाहीत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 11, 2017, 03:44 PM IST
मोदींच्या गावातच हागणदारी मुक्तीचे तीन-तेरा title=

विनोद पाटील, झी मीडिया, वडनगर  :  गुजरातमधील मैसाणा जिल्ह्यातील वडनगर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गाव. मात्र नरेंद्र मोदी यांचंच गाव अजून हगणदारी मुक्त झालेलं नाही. येथील काही भागातील महिला-पुरूष खुल्यावर शौचासाठी जातात. 

अर्ज केलाय पण अजून शौचायलय नाही

शौचालय बनवण्यासाठी काही महिलांनी शौचायलयासाठी अर्ज केला आहे, पण अजून शौचालय बांधण्यात आलेलं नाही. काही महिलांनी सांगितलं की, शौचालय बनवण्यासाठी आम्ही मेहनत घेतली, खर्च केला, पण आम्हाला पैसे देण्यात आले नाहीत.

उघड्यावरच शौचास जाण्याची वेळ

सरकारच्या योजनेत शौचायलय बांधण्यासाठी जे पैसे मिळतात, तेच लाभार्थ्यांना मिळालेले नाहीत, विशेष म्हणजे अनेक शौचालय ही तांत्रिक दृष्ट्या योग्य नसल्याने बंद आहेत. अनेक शौचायलय तुटफूट झाल्याने बंद असल्याचं स्थानिक रहिवासी सांगतात.