गुजरात: 'बहाणे बंद करा गुजरातच्या विकासावर बोला', शत्रुघ्न सिन्हांची मोदींवर तोफ

गुजरात निवडणुकीत कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी भजपला घेरले असतानाच मोदींना आता आपल्या घरातूनही धक्के बसू लागले आहेत.  

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 11, 2017, 03:46 PM IST
गुजरात: 'बहाणे बंद करा गुजरातच्या विकासावर बोला', शत्रुघ्न सिन्हांची मोदींवर तोफ title=

नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीत कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी भजपला घेरले असतानाच मोदींना आता आपल्या घरातूनही धक्के बसू लागले आहेत. भाजप नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही 'बहानेबाजी बंद करा आता गुजरातच्या विकासावर बोला अशी थेट' अशा थेट शब्दांत हल्ला चढवला आहे.

मोदींनी विकासावर भर द्यावा

शत्रुघ्न सिन्हा यांच्या टीकेमुळे भाजपमध्येही खळबळ अन राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी, विकासाचे मुद्दे सोडून केवळ निवडणूक जिंकण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन दररोज नव्या नव्या गोष्टींवरून विरोधी पक्षांवर टीका करणे कितपत योग्य आहे? असा सवाल विचारला आहे. पंतप्रधान मोदींनी इतर मुद्दे सोडून गुजरातच्या विकासावर भर दिला पाहिजे. शत्रुघ्न सिन्हा यांनी कॉंग्रेस नेते मणिशंकर अंय्यर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीवरूनही मोदींनी केलेल्या टीकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पाकिस्तानला निवडणुकीत ओढावे हे केवळ 'इनक्रेडीबल'

शत्रुघ्न यांनी गुजरात निवडणूकीदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या प्रचार अभियानावर प्रश्न उपस्थित करत एकापाठोपाठ एक अशी दोन ट्विट केली आहेत. आपल्या ट्विटमध्ये शत्रुघ्न सिन्हा म्हणतात की, 'आदरणीय सर, केवळ कोणत्याही प्रकारे निवडणूक जिंकण्यासाठी आपण राजकीय विरोधकांबद्धल दररोज अनाकलनीय तितकेच अविश्वसनीय मुद्दे घेऊन येत आहात. आता तर, पाकिस्तान उच्चायुक्तालय आणि जनरल यांनाही निवडणुत ओढले आहे. इनक्रेडिबल'.

महोदय, स्वच्छ आणि आरोग्यदायी राजकारणाकडे परता

पुढच्या ट्विटमध्ये शत्रुघ्न सिन्हा म्हणतात, 'महोदय, नव्या नव्या कहाण्या रचून आरोप करण्यापेक्षा थेट मुद्द्यांवर चर्चा करा. जी आश्वासने आम्ही जनतेला दिली होती जसे की, घर, रोजगार, आरोग्य, शिक्षण, विकास मॉडेल आदी. जातियता पसरवणारे वातावरण थांबवा आणि स्वच्छ आणि आरोग्यदायी राजकारणाकडे परता. जय हिंद!'