‘मोदींवर टीका करणं सोप्पं, पण चूक मुस्लिमांची!’ असं का म्हणाले ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह?

Naseeruddin Shah On Muslims : आपल्या भेधडक वक्तव्यासाठी चर्चेत असलेले अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुस्लीम समाजावर आपलं मत मांडलं आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jun 12, 2024, 08:59 PM IST
‘मोदींवर टीका करणं सोप्पं, पण चूक मुस्लिमांची!’ असं का म्हणाले ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह? title=
Naseeruddin Shah On Muslims & PM Modi

Naseeruddin Shah On PM Modi : दर्जेदार अभिनय, सिनेजगताप्रती असणारी ओढ आणि प्रचंड समर्पकता अशा गुणांमुळं गेली कित्येक दशकं भारतीय चित्रपट जगतात नसिरूद्दीन शाह यांनी मानाचं स्थान मिळवलं आहे. नसीरुद्दीन शाह आपल्या परखड वक्तव्यासाठी ओळखले जातात. मुद्दा राजकीय असो वा सामाजिक नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांनी नेहमी आपलं मत स्पष्टपणे मांडलं अनेक मंचावर मांडलं आहे. त्यामुळे अनेकांनी त्यांना ट्रोल देखील केलंय. त्यांच्या वक्तव्यावरून वाद देखील निर्माण झाले आहेत. अशातच आता नसिरुद्दीन शाह यांनी सुप्रसिद्ध मुलाखतकार करण थापर यांना दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं अन् सर्वांचं लक्ष केंद्रीत केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुस्लीम समाजावर (Muslim Community) त्यांनी आपली मतं मांडली.

नेमकं काय म्हणाले Naseeruddin Shah ?

देशात धार्मिक द्वेष परसवला जातोय, अशी टीका वारंवार केंद्रातील मोदी सरकारवर केली जाते, असा मुद्दा मांडला असता त्यावर नसिरुद्दीन शाह यांनी देशातील मुस्लिमांना जबाबदार ठरवलं. नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) विरोध करणं सोपं आहे. सगळ्या गोष्टींना मोदींना दोष देणं सोपं आहे, पण काही गोष्टी ते सत्तेत येण्याआधीपासून काही चुकीच्या गोष्टी देखील सुरू आहेत. त्यावर कोण बोलणार? मला लहानपणी मुस्लिम असल्याने अनेकप्रकारे हेटाळणीचा सामना करावा लागला होता, त्यामुळे आधीपासूनच छुप्या स्वरुपात नकारात्म भावना सर्वांच्या मनात होती, असं नसिरुद्दीन शाह म्हणाले. मला नरेंद्र मोदी यांना जाळीवाल्या टोपीमध्ये पहायचंय, अशी इच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

फरक फक्त एवढाच होता की, मोदींनी या सगळ्या गोष्टींचा फायदा घैऊन हुशारी दाखवली. मात्र, त्यानंतर धर्मनिरपेक्षता आणि समानतेचे अवशेष उध्वस्त करण्याची संधी उपलब्ध झाली. हिंदू-मुस्लीम ऐक्याचं चित्र चित्रपटांमधून किंवा गाण्यांमधून उभं केलं जायचं. पण मला तरी वाटत नाही की देशातील घटकांनी त्याचा कधी स्विकार केला असावा. काही घटक नक्कीच असे होते, त्यांनी याचा स्विकार केला, असंही नसिरुद्दीन शाह म्हणाले.

मला असं वाटतं की, मुस्लिमांनी नेहमी चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं. मुस्लिमांना शिक्षणाची चिंता करण्यापेक्षा नेहमी हिजाब आणि सानिया मिर्झाच्या स्कर्टच्या लांबीची चिंता राहिली. मुस्लिमांनी आधुनिक शिक्षणावर भर द्यायला हवा. मदरशांमध्ये मुलांना धार्मिक शिक्षण देऊन काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे मुलांना आधुनिक शिक्षणाच्या वाटेवर नेलं पाहिजे, याच चूक ही मुस्लिमांची आहे, असं स्पष्ट मत नसिरुद्दीन शाह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मोदी यांच्याआधी देखील अनेकांनी मुस्लिमांचा विरोध केलाय. हिंदू असो वा मुस्लिम शेवटचे स्वातंत्र्यलढ्यात एकत्र आले होते. माझ्या मते, ती कदाचित शेवटी वेळ होती, त्यानंतर दोन्ही धर्मियांमध्ये एकोपा दिसून आला नाही. राजकारणासाठी गोष्टी होत राहतात. मोदींनी फक्त लोखंड गरम असताना त्यावर खणखणीत घाव घातलाय, असं म्हणत नसिरुद्दीन शाह यांनी आपलं रोखठोक मत मांडलं आहे.