Pulwama Attacked : 'काश्मीर समस्या सुटेपर्यंत अशा घटना होत राहतील'

 नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी रविवारी या प्रकरणावर भाष्य केले. 

Updated: Feb 18, 2019, 07:40 AM IST
Pulwama Attacked : 'काश्मीर समस्या सुटेपर्यंत अशा घटना होत राहतील' title=

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये देशाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. हा हल्ला होण्यामागची कारणे शोधण्यात येत आहेत. तसेच दहशतवाद्यांनी खूप मोठी चूक केली असून त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील असे सूचक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दरम्यान याप्रकरणी 7 संशयितांना देखील अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी केंद्र सरकारतर्फे विरोधी पक्षांची बैठक घेण्यात आली आणि पाकिस्तान निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याआधीच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर आपण केंद्रासोबत असल्याचे जाहीर केले. पुलवामा हल्ल्याप्रकरणी राजकारण होऊ नये अशीच सर्वांची इच्छा आहे.  दरम्यान याप्रकरणी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला यांनी रविवारी या प्रकरणावर भाष्य केले. 

काश्मीरची जनता पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार नसल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत काश्मीरच्या मुद्द्याचे राजकीय समाधान होत नाही तोपर्यंत अशाप्रकारच्या घटना होतच राहतील असे त्यांनी म्हटले. 

काश्मीर घाटीच्या बाहेर काश्मिर विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांवर कथित हल्ले होत आहेत. याप्रकरणीही त्यांनी चिंता व्यक्त केली. पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले या घटनेत सर्वसामान्य नागरिकाची कोणतीही भूमिका नाही आहे.  शुक्रवारी शहरात कर्फ्यू लागल्यानंतर ते घराजवळील मस्जिदमध्ये राहत आहेत. 

या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळीही फारुक अब्दुल्ला यांनी आपली भूमिका मांडली. 'यामध्ये चूक आमची नाही आहे तर तुमची आहे. कारण तुम्ही आमच्या आकांक्षा पूर्ण केल्या नाहीत.' तुम्ही आमच्या मुलांना निशाणा बनवत आहात आणि समस्या वाढवत आहात. 'आम्ही आधीच वाईट अवस्थेत फसलो आहोत. जे झाले त्याला आम्ही जबाबदार नाही आहोत कारण अशा दहशतवादी संघटनांशी आमचा संबंध येत नाही', असेही अब्दुल्ला म्हणाले.

लष्कर- दहशतवाद्यांमध्ये चकमक 

सोमवारी पहाटे जम्मू- काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरू झाली असून, यामध्ये दोन-तीन दहशतवाद्यांना जवानांनी घेरले आहे. एनएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार चकमक होत असणाऱ्या भागामध्ये लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरले आहे. सध्या जम्मू- काश्मीरमध्ये गोळीबार सुरू असल्याची म्हणत आहे. पिंगली भागात २ ते ३ दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या या भागात वातावरण प्रचंड  तणावाचं आहे.