देशात चार महिन्यांत प्रथमच पाहायला मिळाली 'इतकी' रुग्णसंख्या

Coronavirus खरंच नियंत्रणात येतोय का? 

Updated: Nov 17, 2020, 01:08 PM IST
देशात चार महिन्यांत प्रथमच पाहायला मिळाली 'इतकी' रुग्णसंख्या  title=

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून देशभरातील coronavirus कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागील चोवीस तासांमध्ये देशभरातून कोरोनाचे जवळपास ३० हजारहूनही कमी रुग्ण आढळल्याचं पाहायला मिळालं. 

गेल्या २४ तासांमध्ये देशात २९१६३ नवे कोरोनाबाधित आढळले. १४ जुलैनंतर जवळपास चार महिन्यांनी देशात इतक्या कमी रुग्णांची नोंद करण्यात आली. १४ जुलै रोजी देशातील कोरोना रुग्णांची संख्या २८४९८ इतकी होती. 

नव्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीसह आता देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८८७४२९० वर पोहोचला आहे.  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार मागी २४ तासांमध्ये ४४९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळं एकूण मृतांचा आकडा १३०५१९ वर पोहोचला आहे. 

 

देशातील एकूण रिकव्हरी रेटबाबत सांगावं तर तो आता ९३.४२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, अवघ्या चोवीस तासांमध्ये ४०७९१ रुग्ण यातून सावरले आहेत. आता देशात कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडा ५.१ टक्के इतकाच उरला आहे.

शुक्रवारपासून काही अंशी कमी झालेल्या चाचण्यांमुळं ही रुग्णसंख्या कमी दिसून येत असल्याचं म्हटलं जात आहे. पण, कोरोनाबाधितांचा आलेखही खालीच उतरताना दिसत आहे. तेव्हा आता येत्या काळात हा कोरोना देशातून पूर्णपणे नाही करण्यात यश मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.