NEET Result 2022 : या तारखेला जाहीर होऊ शकतो NEET परीक्षेचा निकाल, कसा आणि कुठे पाहाल निकाल?

21 ऑगस्ट ला  NEET UG Result 2022 निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार

Updated: Aug 14, 2022, 10:01 AM IST
NEET Result 2022 : या तारखेला जाहीर होऊ शकतो NEET परीक्षेचा निकाल, कसा आणि कुठे पाहाल निकाल? title=

मुंबई: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच NEET 2022 चा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. निकालाच्या तारखेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, 21 ऑगस्ट ला  NEET UG Result 2022 निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाईट neet.nta.ac.in वर जाऊन आपला निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतील. या परीक्षेत 18.72 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे.

कसा पाहू शकाल निकाल 
–  NTAची अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in  वर जा.
–  NEET UG 2022 Result च्या लिंकवर क्लिक करा
–  तिथं आपला अनुक्रमांक किंवा मागितलेली माहिती भरा
–  एंटर केल्यानंतर आपला निकाल स्क्रिनवर दिसेल  

या वर्षी 17 जुलै रोजी NEET UG 2022 परीक्षा घेण्यात आली. यावर्षी 18.72 लाखांहून अधिक उमेदवारांनी यूजी मेडिकल / डेंटल प्रवेश परीक्षा दिली होती.