खाद्य तेल आयात शुल्कात वाढ, पण अद्याप दिलासा नाही

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Updated: Nov 20, 2017, 02:58 PM IST
खाद्य तेल आयात शुल्कात वाढ, पण अद्याप दिलासा नाही title=

नवी दिल्ली : खाद्य तेलावरील आयात शुल्कात केंद्र सरकारने वाढ केली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. 

आता शुल्क वाढवलं, पण हमीभाव नाही

पामतेलावर 30 टक्के, रिफाइंड सूर्यफुलावर 35 टक्के, क्रुड सोयाबीनवर 30 टक्के, तर रिफाइंड सोयाबीनवर 35 टक्के, मोहरी तेलावर 25 आणि 35 टक्के आयात शुल्क करण्यात आलं आहे. 

देशी तेल उद्योगाला मोठा दिलासा

सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी आणि देशी तेल उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने डाळीची आयात बंद करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं म्हटलं जात होतं.

शेतकऱ्यांना हवा आहे, हमीभाव

खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवलं पण शेतकऱ्यांना अद्याप याचा फायदा होणे कठीण असल्याचं म्हटलं जात आहे, कारण शेती मालाला अजून हमीभाव मिळालेला नाही. त्यात तिळ, शेंगदाणा, सूर्यफूल अशा मालाचा भाव अजूनही हमी भावापेक्षा २० ते १५ टक्के कमी आहे.