कोचिंग क्लासेस बंद होणार; शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय

Education News : तुमची मुलंही कोचिंग क्लासला जातात का? त्यांचं नेमकं वय काय? कोचिंग क्लासनं तुम्हाला कोणती हमी दिली आहे का? पाहा महत्त्वाची बातमी   

सायली पाटील | Updated: Jan 19, 2024, 08:10 AM IST
कोचिंग क्लासेस बंद होणार; शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय  title=
New Guidelines for coaching institutes no tution for students less than 16 years says education ministry

Education News : मुलं अमुक एका वयात आली की त्यांच्या शैक्षणित पात्रतेनुसार पालकही भवितव्याच्या दृष्टीनं त्यांना शिकवणी, कोचिंग क्लासच्या वाटेवर पाठवतात. अनेक पालक या मुलांना शालेय वर्गांनंतरही जास्तीची शिकवणी सुरु करतात. आता मात्र तसं होणार नाहीये. कारण, शासन निर्णयानंतर आता अनेक विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लास बंद होणार आहेत. शिक्षण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यानंतर तातडीनं हे बदल लागू केले जाणार आहेत. (New Guidelines for coaching institutes)

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं देशभरातील 16 वर्षांखालील मुलांचे कोचिंग अर्थात शिकवणी वर्ग बंद होणार असल्याचं नुकतंच स्पष्ट केलं. केंद्रानं आखलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना या शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये. इतकंच नाही, तर आता कोचिंग क्लासेस चांगले गुण आणि अव्वल स्थान वगैरेची हमीसुद्धा देऊ शकणार नाहीयेत. 

का घेण्यात आला हा निर्णय? 

केंद्रानं हा निर्णय तडकाफडकी घेतला नसून, खासगी कोचिंग क्लासेसच्या फीमध्ये झालेली वारेमाप वाढ आणि फसवी प्रलोभनं लक्षात घेत या साऱ्याला आवर घालण्यासाठी कायदेशीर चौकटीची गरज लक्षात घेतली आणि सदर निर्णय जाहीर करत त्या धर्तीवर मार्गदर्शक तत्त्वं जारी केली. 

हेसुद्धा वाचा : Weather Update : जबरदस्त! राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार; दडवलेले कानटोप्या, स्वेटर बाहेर काढा

 

...तर कोचिंग क्लासची मान्यता रद्द 

केंद्रानं आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचना न पाळल्यास त्या संस्थांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून 1 लाख रुपये किंवा त्याहून जास्त शुल्क दंड स्वरुपात आकारलं जाईल. इतकंच नव्हे त्या कोचिंग क्लासची मान्यताही  रद्द करण्यात येईल असंही मंत्रालयानं बजावलं. 

केंद्रानं आखलेल्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे? 

  • कोचिंग क्लास किंवा संस्थांकडून विद्यार्थ्यांना चांगले गुण आणि रँकिंगची हमी दिली जाऊ शकत नाही. 
  • 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासमध्ये प्रवेश देता येणार नाही. 
  • गुणवत्ता, निकाल किंवा तत्सम दावा करणारी जाहीरात कोचिंग क्लासला करता येणार नाही. 
  • कोचिंग क्लासकडून विविध अभ्यासक्रमांसाठीच्या शुल्कामध्ये पारदर्शकता असावी. 
  • 16 वर्षांवरील विद्यार्थ्याला प्रवेश दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी क्लास मध्येच सोडल्यास उर्वरित वर्षाची फी त्यांना परत करावी. 
  • कोणत्याही कोचिंग क्लास किंवा तत्सम संस्थेकडून पदवीहून कमी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती केली जाऊ नये.