नवी दिल्ली : नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाचे नवीन बॉन्ड
सर्व बॅँका 3.5 ते 4 टक्कयांचं दरमहिन्याला व्याज देतायेत. सर्वसामान्य नागरिकांना यापेक्षा जास्त व्याज आणि सोबत सुरक्षितता अपेक्षित आहेत.
केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारी नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (एऩ एच ए आय) ही महामार्गांची निर्मिती करणारी कंपनी. या कंपनीचे बॉन्ड लवकरच बाजारात येता आहेत. त्यावर 7.5 टक्के व्याज दिलं जाईल. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज दिलं जाणार आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.
सरकारने देशभरात रस्त्यांचं आणि महामार्गांचं जाळं तयार करण्यासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. या बॉन्डच्या माध्यमातून नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया मोठा निधी उभा करणार आहे. हा पैसा रस्ते आणि महामार्ग बांधण्यासाठी वापरला जाईल.
या बॉन्डचं कालावधी 10 वर्षांचा असणार आहे. यातून येणारं व्याज दरमहिन्याला गुंतवणूकधारकांच्या खात्यात जमा करण्यात येईल. या बॉन्डचं रेटींग हे उत्तम असून त्याला "एएए" रेटिंग दिलं गेलं आहे. रस्ते आणि महामार्ग विकासासाठी सरकार 7.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.