नितीन गडकरींकडून जवाहरलाल नेहरूंचं जाहीरपणे कौतुक

 नेहरुंचे विचार आपल्याला फार आवडतात असंही गडकरींनी यावेळी सांगितलं. 

Updated: Dec 25, 2018, 04:04 PM IST
नितीन गडकरींकडून जवाहरलाल नेहरूंचं जाहीरपणे कौतुक  title=

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणाचे आणि त्यातून मांडलेल्या भूमिकेचं जाहीररित्या कौतुक केलं आहे. नेहरु म्हणायचे भारत हा देश नाही, लोकसंख्या आहे. या देशाचा प्रत्येक व्यक्ती देशासाठी प्रश्न आहे, समस्या आहे. नेहरूचे हे भाषण आणि विचार आपल्याला आवडतात असं गडकरींनी म्हटलं आहे. एखाद्या समस्येवर तोडगा काढू शकत नसू तर आपल्याला या समस्येचा भागही बनता कामा नये, हे नेहरुंचे विचार आपल्याला फार आवडतात असंही गडकरींनी यावेळी सांगितलं. 

सहिष्णुता भारताची सर्वांत मोठी देणं असून ही आपल्या व्यवस्थेचा एक मोठा भाग आहे. त्यामुळे एखाद्याने चुकीचं केलं तर आपणही त्याला तशीच प्रतिक्रिया द्यायची ही मानसिकता चुकीची असल्याचेही गडकरींनी कुणाचंही नाव न घेता म्हटलं आहे.

पाहा काय बोलले नितीन गडकरी