नवी दिल्ली : Noise Pollution in Delhi देशाच्या राजधानी दिल्लीत आता विनापरवानगी ध्वनी प्रदूषण केल्यास तुम्हाला जबर दंड भरावा लागणार आहे. राजधानीमध्ये प्रदूषणाची वाढती पातळी पाहता. प्रदुषण नियंत्रण समितीने शनिवारी ध्वनी नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर 10 हजार ते 1 लाखापर्यंत दंड लावण्यात येणार आहे.
लाऊडस्पिकरवर ध्वनी प्रदुषण करून उच्छाद मांडणाऱ्यांना हा दंड लावण्यात येणार आहे. विना परवानगी 1000 किलोवॅट एम्पिअर पेक्षा अधिक डिझेल जनरेटर सेटवरून आवाज करणाऱ्यांवर 1 लाख रुपये दंड आकारण्यात येईल. एनजीटीतर्फेदेखील या नियमांना मंजूरी देण्यात आली आहे.
फटाके जाळल्याने भरावा लागेल दंड
रहिवासी परिसरांमध्ये फटाके जाळल्याने देखील नियमांनुसार दंड होणार आहे. सायलेंट झोनमध्ये फटाके जाळल्यास 3000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतं.
NGT ने 13 ऑगस्ट 2020 ला दिल्ली सरकार, दिल्ली पोलीस, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाला नियम लागू करण्यास सांगितले होते.