शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये देशाचं नाव बदलणार, आता 'इंडिया' नाही 'भारत'

NCERT Books : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग च्या पुस्तकांमध्ये लवकरच बदल दिसणार आहे.. खरं तर, एनसीईआरटीने स्थापन केलेल्या समितीने पुस्तकांमध्ये 'इंडिया' बदलून 'भारत' करण्याची शिफारस केली होती. 

आकाश नेटके | Updated: Oct 25, 2023, 02:46 PM IST
शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये देशाचं नाव बदलणार, आता 'इंडिया' नाही 'भारत' title=

NCERT Books : एनसीईआरटीच्या (NCERT) पुस्तकांमध्ये नवा ऐतिहासिक बदल होणार आहे. या बदलानंतर आता विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्ये इंडियाऐवजी (India) भारत (Bharat) हा शब्द शिकवला जाणार आहे. एनसीईआरटीच्या पॅनलने सर्व एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये भारताचे नाव बदलून भारत करण्याचा प्रस्ताव एकमताने स्वीकारला आहे. देशातील विरोधी आघाडीने त्यांचे नाव बदलून I.N.D.I.A.ठेवल्यानंतर यावरुन जोरदार चर्चा होत होती. आता अशातच एनसीईआरटीने मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये INDIA या शब्दाऐवजी भारत हा शब्द सर्वत्र वापरला जाईल. यासंबंधीचा प्रस्ताव एनसीईआरटीच्या पॅनेलसमोर मांडण्यात आला, जो एकमताने स्वीकारण्यात आला.

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग पॅनेलने सर्व एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये इंडियाच्या जागी भारत या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. पॅनलच्या सर्व सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. हा बदल एनसीईआरटी पुस्तकांच्या पुढील संचामध्ये दिसून येईल. सुरुवातीला काही महिन्यांपूर्वी  हा प्रस्ताव  ठेवण्यात आला होता. पण आता त्याला औपचारिक पाठिंबा मिळाला आहे.

देशात भारत विरुद्ध इंडिया असा मुद्दातापलेला असताना नसीईआरटीने ही घोषणा केली आहे. G-20 परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवर 'भारताचे राष्ट्रपती' असे लिहिलेले दिसल्याने हा संपूर्ण प्रकार समोर आला होता. यानंतर विरोधकांनी या मुद्द्यावरुन जोरदार टीका केली होती. मात्र, त्यानंतरही अनेक वेळा इंडियाऐवजी भारत असे लिहिले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या नावाच्या फलकावर 'भारताचे पंतप्रधान' असे लिहिलेले पाहायला मिळते होते. 

समितीने पाठ्यपुस्तकांमध्ये 'प्राचीन इतिहास'च्या जागी 'शास्त्रीय इतिहास' समाविष्ट करण्याची शिफारस केली होती. इतिहासाची यापुढे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशी विभागणी केली जाणार नाही, कारण भारत हे एक जुने राष्ट्र आहे आणि ब्रिटिश साम्राज्यवादाबद्दल अनभिज्ञ आहे. ब्रिटिशांनी भारतीय इतिहासाची प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशी विभागणी केली आहे. आता प्राचीन म्हणजे प्राचीन. देश अंधारात होता, जणू काही वैज्ञानिक जाणीवच नाही, हे यातून दिसून येते. आर्यभटाच्या सूर्यमालेवरील कार्यासह अशी अनेक उदाहरणे आहेत, असे समितीनं म्हटलं होतं.