ट्रेनमध्ये तिने त्याच्या बर्थवर ठेवला पाय, ट्रेनमधील तिच्या आणि त्याच्या प्रेमाचा व्हिडीओ व्हायरल

Old Couple Cute Video : तिचा आणि त्याचा व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल, नेटकरी म्हणतात, ही तर 'नेलपॉलिश लव्ह स्टोरी'...  

Updated: Nov 2, 2022, 07:41 PM IST
ट्रेनमध्ये तिने त्याच्या बर्थवर ठेवला पाय, ट्रेनमधील तिच्या आणि त्याच्या प्रेमाचा व्हिडीओ व्हायरल title=

Train Viral Video : आपण सर्वच जण सोशल मीडियावरील व्हिडीओ प्रचंड प्रमाणात पाहत असतो. ज्या व्हिडिओंमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता आहे असे व्हिडीओ प्रचंड व्हायरल ( Viral Video) होतात. तुम्ही कितीही मोठे क्रिएटर असा किंवा नुकतेच व्हिडीओ बनवणारे आसा, तुम्ही बनवलेल्या व्हिडिओमध्ये लोकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असेल तर लोकांनाही तो व्हिडीओ पाहायला आवडतोच आणि असे व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. या व्हिडीओमध्ये प्रॅन्क, प्राण्यांचे व्हिडीओ, रेल्वेमधील भांडणाचे व्हिडीओ किंवा नवरा बायकोचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. असाच एका कपलचा ट्रेनमधील ( Old couple train video ) व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. खरंतर नवरा आणि बायको यांच्यात खटके उडणे किंवा एकमेकांच्या खोड्या काढणे, असे व्हिडीओ पाहिले जातात. मात्र हा व्हायरल होणारा व्हिडीओ आहे प्रेमाचा. या व्हिडिओमध्ये त्या दोघांमधील प्रेम, एकमेकांप्रतीची भावनिक ऋणानुबंध किती घट्ट आहेत ( Emotional Attachment ) हे पाहायला मिळतं. तुम्हीही हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. 

तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात तर तुम्हाला हे कपल ट्रेनमध्ये खालच्या सीटवर समोरासमोर बसलेले पाहायला मिळतात. या महिलेचा एक पाय समोरच्या बर्थवर म्हणजेच त्याच्या बर्थवर आहे. अतिशय प्रेमाने तोही तिच्या पायाच्या नखांवर नेलपॉलिश लावताना पाहायला मिळतो. हा माणूस एवढ्या एकाग्रतेने बायकोच्या पायाच्या नखांना पॉलिश लावतोय की त्याचं कुणी रेकॉर्डिंग करतंय याकडेही त्याचं लक्ष नाही. हे दोघे नवरा बायको असल्याचं बोललं जातंय. 

हा व्हिडीओ एका इन्स्ट्राग्राम हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आहे. @ dlipsolnki या हॅण्डलवरून 16 ऑक्टोबर रोजी हा व्हिडीओ शेअर झालेला आहे. या व्हिडिओवर हिंदीत एक सुंदर कॅप्शनही लिहिलं आहे. "यूं ही चलते रहें प्यार के काफिले, यूंही मिलते रहें हम-सफर प्यार के" असं कॅप्शन या व्हिडिओवर लिहिण्यात आलेलं आहे. 

सोशल मीडियावर Video Viral    

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dilip solanki (@dlipsolnki)

या काही सेकंदांच्या क्लिपवर नेतकऱ्यांनी आतापर्यंत तब्बल 1 लाख 60 हजारांहून अधिकांनी लाईक्स ठोकले आहेत. या व्हिडिओला व्यूव्हजही मोठ्या प्रमाणात मिळाले आहेत आणि दिवसेंदिवस वाढतानाही पाहायला मिळतायत.  या कपलला "कुणाची नजर लागू नये" अशा कमेंट्स येत आहेत. तर काही जण म्हणतायत की हा जगातील सर्वात सुंदर व्हडिओ आहे. 

old couples cute video in train goes viral netizens says this is video of the year