मुंबई : ऑप्टिकल इल्युजनशी (Optical Illusion) संबंधित फोटो सोशल मीडियावर सर्वाधिक शेअर केल्या जाणाऱ्या आणि शोधल्या जाणाऱ्या गोष्टीपैकी एक आहे. यातील चित्र काहीसे दिसतं पण प्रत्यक्षात ते वेगळेच असतात. त्यामुळे बुद्धीचा चांगलाच कस लागतो. इंटरनेटच्या दुनियेत आपल्यासमोर काही ना काही गोष्टी येतच असतात. हे आपलं मनोरंजन करतात तर काही गोष्टी आपल्याला विचारात पाडतात. सध्या लोकांचा कल ऑप्टीकल इल्यूजनकडे आहे आणि लोकांना अशी कोडी सोडवायला फार आवडते.
खरंतर ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो आपल्या मेंदूला चालना देतात आणि आपल्या डोळ्यांना धोका देतात. परंतु असं असून देखील ज्या लोकांना यामधील कोडं सोडवता येतं, ते लोक फारच हुशार सिद्ध होतात.
आता देखील इंटरनेटवर एक चक्रावणारा फोटो व्हायरल होत आहे. फोटोची रचना कलाकाराने अशा प्रकारे केली आहे की, फोटोमध्ये लपलेला पांडा (panda)शोधण्यासाठी तुम्हाला मोठी कसरत करावी लागणार आहे.
ऑप्टिकल इल्युजनमुळे तुमचं कौशल्य पणाला लागतं. तसेच संयमाचीही परीक्षा लागते. आज आम्ही तुमच्यासाठी आणखी एक आव्हान घेऊन आलो आहोत. तुम्हाला 20 सेकंदात सांगायचे आहे की यापैकी पांडा कुठे दडला आहे.
जर तुम्ही पांडा शोधू शकला नसाल तर खाली दिलेल्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की पांडा नक्की कुठे लपला आहे. सध्या हे Optical Illusion सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.