पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, बड़े-बड़े.. बड़े-बड़े करत राहिले, नक्की झालं काय ?

पाकिस्तान नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असतो. पण आता तर चक्कं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हेच ट्रोल झाले आहेत.

Updated: Mar 5, 2021, 10:41 PM IST
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, बड़े-बड़े.. बड़े-बड़े करत राहिले, नक्की झालं काय ? title=

मुंबई : आपल्या शेजारील देश पाकिस्तान नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असतो. पण आता तर चक्कं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हेच ट्रोल झाले आहेत. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी यामध्ये आणखी भर टाकली आहे. लाईव्ह भाषणादरम्यान इम्रान खान अचानक आपल्याला काय म्हणायचे आहे हेच विसरले. पुढे काय बोलावे आणि आपण काय बोलत होतो यामध्येच ते गोंधळून गेले.

पाकिस्तानाला यशाचे आणि चांगल्या दिवसाचे स्वप्न दाखवणारे पंतप्रधान इम्रान खान वाढत्या महागाई आणि आकाशाला भिडणाऱ्या गॅस आणि पेट्रोलच्या किंमती विषयी एक शब्द ही काढत नाही. यावर इम्रान खान दररोज सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. त्यातच आता हा व्हिडिओ, इम्रान खान यांनी त्यांच्या ट्रोलर्सला दिलेला आयत कोलीत आहे.

पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इम्रान खान देशवासियांना संबोधित करताना दिसत आहेत, त्याच बरोबर ते विरोधी पक्षाला उत्तरे देत असताना पहायला मिळाले. पण त्यानंतर जे झालं ते खूपचं मजेदार होतं. कारण खान साहेब पुढे बोलायला लागले की ‘यह जो सारे…बड़े-बड़े… बड़े-बड़े। क्या हैं यह? जो भी हैं।’  ते बोलता बोलता मध्येच काय बोलायचं तेच विसरले, आणि कसं बसं त्यांचं बोलण पूर्ण केलं.

फक्त 17 सेकेंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडिया वर इतका शेअर झाला की या व्हिडिओला सोशल मीडियावर एक लाखापेक्षा जास्त व्हिव मिळाले आहेत. त्याच बरोबर काही लोकं आपल्या आपल्या पद्धतीने त्या व्हिडिओवर रिएक्शन देत आहेत. काही जण त्यांना गोलमालमधला 'भूला' म्हणून बोलत आहेत. तर काही जण खोचक शब्दात टीका करत आहेत.
‘अरे कहना क्या चाहते हो’.