मोठा खुलासा! जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांकरता पाकिस्तानमध्ये दोन नवीन संघटना

सुरक्षा एजन्सीच्या माहितीनुसार

Updated: Apr 16, 2020, 07:12 AM IST
मोठा खुलासा! जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांकरता पाकिस्तानमध्ये दोन नवीन संघटना title=

मुंबई : केंद्रीय सुरक्षा एजन्सीने केलेल्या खुलासानुसार, पाकिस्तानच्या ISI ने जम्मू काश्मीरमध्ये दोन नवीन दहशतवादी ग्रुप बनवले आहेत. ज्यामुळे ते भारतावर खूप मोठा दहशतवादी हल्ला करणार आहे. झी न्यूजला मिळालेल्या एक्सक्लू झिव माहितीमध्ये दोन ग्रुप बनवले असून त्यांची नावे देखील ठरवण्यात आली आहेत. 'द रिजिटेंस फ्रंट (The Resistance Front)'आणि 'तहरीक ए मिल्लत इस्लामी (Tehreek-i-Milat-I-Islami)' अशी या ग्रुपची नाव आहे. 

सुरक्षा एजन्सीच्या माहितीनुसार, या दहशतवादी संघटना लष्कर ए तोयब्बाच्या मदतीने तयार झाले असून त्यांच The Resisitance Front (TRF) ज्याचं दुसरं नाव जे के फायटर्स देखील आहेत. ही संघटना गेल्या दोन महिन्यांपासून ऍक्टिव आहे. तर तहरिक ए मिल्लत इस्लामीबाबत सुरक्षा एजन्सी अधिक माहिती काढण्यात व्यस्त आहेत. 

तहरीक ए मिल्लत इस्लामी कमांडर नईम फिरदौसने एक नवीन ऑडिओ मॅसेज जाहीर केला आहे. यामध्ये त्याने सगळ्या दहशतवाद्यांना मिळून एक सुरक्षा एजन्सीवर हल्ला करण्यासाठी सांगितलं आहे. तर TRF कमांडर अबु अनसने आपल्या ऑडिओ मॅसेजमध्ये भारतात मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. अबु अनसने काश्मिरी नेता अल्ताफ बुखारींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दोन्ही दहशतवादी संघटना सोशल मीडियावर ऍक्टीव आहेत. 

सुरक्षा एजन्सीच्या माहितीनुसार दहशतवादी संघटना पाकिस्तानच्या इशाऱ्यानुसार काश्मिरमध्ये दहशतवाद हल्लाचा कट रचत आहेत. सुरक्षा रक्षकांवर हल्ला करून यानंतर पाकिस्तानवर कुणी टीका करणार नाही याकडे त्यांच अधिक लक्ष आहे.