पाकिस्तानी महिलेने मानले सुषमा स्वराज यांचे आभार...

पाकिस्तानातील एका कुटुंबाने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत. या कुटुंबातील एक लहान मुलगा अस्थिमज्जा (Bone marrow) वर इलाज करण्यासाठी भारतात आणण्याकरता मेडिकल व्हिजा दिल्याने या कुटुंबीयांनी सुषमा स्वराज यांना धन्यवाद दिले आहेत. लोकांची मदत करण्यात सुषमा स्वराज यांचे नाव सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 22, 2017, 04:00 PM IST
पाकिस्तानी महिलेने मानले सुषमा स्वराज यांचे आभार...  title=

नवी दिल्ली : पाकिस्तानातील एका कुटुंबाने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत. या कुटुंबातील एका लहान मुलगा अस्थिमज्जा (Bone marrow) वर इलाज करण्यासाठी भारतात आणण्याकरता मेडिकल व्हिजा दिल्याने या कुटुंबीयांनी सुषमा स्वराज यांना धन्यवाद दिले आहेत. लोकांची मदत करण्यात सुषमा स्वराज यांचे नाव सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. 

 

गेल्या आठवड्यात पाकिस्तानात राहणाऱ्या लता शारदा त्यांच्या नातेवाईकांना मेडिकल व्हिजा देण्यासाठी सुषमा स्वराज यांच्याकडे शब्द टाकला. आणि बाळाला उपचारांनासाठी भारतात येणे आवश्यक असल्याचे सांगितले. 

सोमवारी या महिलेने ट्वीट करून बाळाच्या फोटो सहित स्वराज यांचे आभार मानले.