मुंबई : आधार कार्ड (Adhar Card) नंतर पॅन कार्ड (Pan Card) हे दुसरं महत्वाचं कागदपत्र बनलंय. त्यामुळे कोणतेही बॅकींग, लोन अथवा सरकारी काम असुद्या या सर्व गोष्टींसाठी पॅन कार्ड खुप गरजेचे आहे. जर तुमच्याजवळ पॅन कार्ड नसेल तर तुमची अनेक कामे रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांनी पॅन कार्ड काढले आहे, त्यांच्यासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे.
आजच्या काळात पॅन कार्ड हे अनिवार्य कागदपत्र बनलंय. त्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार होऊ शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? पॅन कार्डशी (Pan Card) संबंधित एखादी चूक तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान करू शकते. त्यामुळे तुम्ही तर ही चुक करत नाही आहेत, हे या बातमीतून पडताळून पाहा.
...तर 10 हजारांचा दंड
जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड (Pan Card) असतील तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. हे तुमचे बँक खातेही (Bank Account) गोठवू शकते. याशिवाय तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो. त्यामुळे, जर तुमच्याकडे दोन पॅनकार्ड असतील तर लगेच तुमचे दुसरे पॅनकार्ड (Pan Card) विभागाकडे सरेंडर करावे लागेल.
दरम्यान आयकर कायदा 1961 च्या कलम 272B मध्येही यासाठी तरतूद आहे. तुम्ही तुमचे दुसरे पॅन कार्ड (Pan Card) कसे सरेंडर करू शकाल, हे आम्ही तुम्हाला सांगतो.
असे करा सरेंडर
दरम्यान एकाच पत्त्यावर एकाच व्यक्तीच्या नावाने येणारी दोन भिन्न पॅन कार्डे (Pan Card) या श्रेणीत येतात. तुमच्याकडेही दोन पॅनकार्ड असतील तर तुम्हाला एक सरेंडर करावे लागेल.