रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली: भारतीय निमलष्करी दलाने स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार आजपासून निमलष्करी दलाच्या कँटीनमध्ये विदेशी उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १ हजार विदेशी उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय पोलीस कल्याणद्वारे चालविले जाणाऱ्या सीडीएस कँटीनमध्ये आता फक्त स्वदेशी साहित्य मिळेल.
निमलष्करी दलातील सीआरपीएफ, बीएसएफ, आईटीबीपी, सीआयएसएफ, सीमा सुरक्षा बल, एनएसजी, असम रायफल्सचे १० लाख जवान आणि त्यांचे ५० लाख कुटुंबिय कँटीनमधील उत्पादनाचा लाभ घेतात. आता या सर्वांना स्वदेशी वस्तू खरेदी कराव्या लागणार आहेत.
Marurti Suzukiला फटका; केवळ इतक्या कारची विक्री
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात 'आत्मनिर्भर भारत'चा नारा दिला होता. यावेळी त्यांनी स्थानिक उत्पादनांसाठी आग्रहा व्हा, असे सांगितले होते. आपल्या देशातील नागरिक 'लोकल'साठी व्होकल झाले तर ही उत्पादने आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारुपाला येतील. याशिवाय, देशांतर्गत बाजारपेठेलाही चालना मिळेल, असे मोदींनी म्हटले होते.
बहिष्कार कशावर ?
यात कपडे, इलेक्ट्रॉनिक उत्पादन, टूथ पेस्ट, शाम्पू, बॅग, हॉर्लिक्स, हॅवल्सचे उत्पादन, फूटवेअर, स्केचर, रेड बुल ड्रिंक, माइक्रोवेव्ह, यावर बहिष्कार घालण्यात आला आहे.