मुंबई : आयपीओ मार्केटमध्ये पुन्हा मोठ्या कमाईची मिळणार आहे. पारस डिफेन्स ऍंड स्पेस टेक्नोलॉजी लिमिटेड (Paras Defence and Space Technologies Ltd)चा इश्यू 21 सप्टेबरला सब्सक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. हा आयपीओ 23 सप्टेंबर पर्यंत सब्सक्राइब करता येऊ शकतो. पारस डिफेन्सच्या आयपीओची प्राइस बॅंड 165-175 रुपये प्रति शेअर इतकी असणार आहे. यामध्ये फ्रेश इक्विटी शेअर जारी केले जाणार असून ऑफर फॉर सेल (OFS)सुद्धा असणार आहे. जर तुम्हाला हा आयपीओ सब्सक्राइब करायचा असेल. त्याविषयी माहिती जाणून घ्या.
17.24 लाखा शेअर्स OFS
पारस डिफेन्सच्या आयपीओमध्ये 140.60 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर जारी करण्यात येणार आहेत. त्यामध्ये 17.24 लाख इक्विटी शेअर ऑफर फॉर सेल (OFS)च्या माध्यमातून विकले जातील. ज्यांची एकूण वॅल्यू 30.17 कोटी रुपये असणार आहे. OFSच्या माध्यमातून प्रमोटर्स आणि गुंतवणूकदार आपली हिस्सेदारी कमी करतील. OFSमध्ये साधारण 12.5 लाख शेअर शरद विर्जी शाह, साधारण 50 हजार शेअर मुंजल शरद शाह, 3 लाख शेअर अमी मुंजल शाह, 62245 शेअर शिल्पा महाजन आणि 62245 शेअर अमित नवीन महाजन यांच्या तर्फे विकले जाणार आहेत. हा शेअर 1 ऑक्टोबर रोजी बाजारात लिस्ट होतील.
कमीत कमी गुंतवणूक
Paras Defence ने आयपीओसाठी प्राइस बॅंड 165-175 रुपये प्रति शेअर निश्चित केली असून इश्यूमध्ये 85 शेअर्सचा एक लॉट असणार आहे. कमीत कमी एक लॉट खरेदी करायचा असल्यास 14875 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
कंपनीचा व्यवसाय
Paras Defence and Space Technologies डिफेन्स आणि स्पेस ऑप्टिक्स, डिफेन्स इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स प्रोटेक्शन सोल्यूशन आणि अवजड अभियांत्रिकी क्षेत्रात व्यवसाय करते.