आताची मोठी बातमी! संसदेत स्मोक अटॅक करणाऱ्या आरोपींवर 'हा' गंभीर गुन्हा दाखल

Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्या चार आरोपींना सात दिवसांच्या पोलीस कोठडित पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी 15 दिवसांची रिमांड मागितली होती. कोर्टाने सात दिवसांच्या कोठडीला मंजूरी दिली आहे. गरज वाटल्यास कोठडीत वाढ करण्यात येईल असं कोर्टाने सांगितलंय.

राजीव कासले | Updated: Dec 14, 2023, 07:41 PM IST
आताची मोठी बातमी! संसदेत स्मोक अटॅक करणाऱ्या आरोपींवर 'हा' गंभीर गुन्हा दाखल title=

Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्या चार आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. या चारही आरोपींवर दहशतवादाचा आरोप लावण्यात आला आहे. या चौघांनीही भीती निर्माण करण्याचा केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. कटाचा मास्टरमाईंड ललित झा फरार आहे. लोकसभेत आणि बाहेर ज्या स्मोक कँडलने (Smoke Candle) अटॅक करण्यात आला होता. त्या आरोपींनी कुठून खरेदी केल्या होत्या याचा पोलीस शोध घेत आहेत. 13 डिसेंबर 2023 ला लोकसभेचं कामकाज सुरु असताना प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी संसदेत उडी मारली आणि स्मोक कँडलने सभागृहात पिवळा धुर पसरवला. तर संसदेच्या बाहेर दोघांनी स्मोक अटॅक केला. या चारही जणांना पोलिसांनी अटक केली. 

आतापर्यंत पाच लोकांना अटक
लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या सर्व आरोपींची ओळख पटली आहे. संसदेत घुसखोरी करणाऱ्या दोन आरोपींची नावं सागर शर्मा आणि मनोरंजन अशी आहेत. सागरने मैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या पासवर लोकसभेत एन्ट्री केली होती. तर संसदेबाहेर निदर्शनं करणाऱ्या आरोपींची नावं नीलम कौर आणि अमोल शिंदे अशी आहेत. अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहे. घरी भरती होण्यासाठी जात असल्याचं सांगत अमोर दिल्लीला पोहोचला होता. तर पाचव्या आरोपीचं नाव विशाल असं आहे. चारही आरोपी गुरुग्राममध्ये विशालच्या घरी थांबले होते. 

कटाचा मास्टरमाईंड फरार
कटाचा मास्टरमाईंडचं नाव ललित झा असं तो फरार आहे. संसदेत ज्या स्मोक कँडलने अटॅक करण्यात आला त्या कँडल कुठून खरेदी केल्या होत्याच याचाही पोलीस शोध घेत आहेत. पाचही आरोपी वेगवेगळ्या राज्यातले आहेत. सागर शर्मा हा उत्तर प्रदेशमधल्या लखनऊ इथं राहाणार आहे. तर मनोरंज डी कर्नाटकच्या मैसूरमधला आहे. नीलम कौर ही हरियाणातल्या हिस्सारमध्ये राहणारी आहे. तर अमोल शिंदे हा महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातला आहे. नीलम कौरला अटक केल्यानंतर तानाशाही नही चलेगी अशी घोषणाबाजी तीने केली होती. पाचवा आरोपी विशाल शर्मा आणि मास्टरमाईंड ललित झा हे हरियाणातले आहेत. 

सर्व आरोपी सोशल मीडिया पेजवर भगत सिंह फॅन क्लबशी जोडले गेले आहेत. हे सर्व दीड वर्षांपूर्वी मैसूरमध्ये पहिल्यांदा भेटले. त्यानंतर नऊ महिन्यांनी पुन्हा एकदा भेटले, या भेटीत संसदेत घुसखोरी करण्याचा कट आखल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

आठ कर्मचारी निलंबित
दरम्यान, संसद घुसखोरी प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे.. लोकसभा सचिवालयाने 8 कर्मचाऱ्यांना निलंबीत केलंय. सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आलाय.