नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेत 11,300 कोटींचा घोटाळा करणारे हिरा व्यापारी नीरव मोदी यांच्या प्रकरणामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकजण त्रासले, संतापले, दुःखी झाले तर अनेकांनी त्यावर जोक्स बनवले. त्यानंतर नीरव मोदींवर अनेक गोष्टी लिहून आल्या. पण आज जे तुम्ही ऐकणार आहात ते तुम्ही यापूर्वी ऐकले नसेल. या घोटाळ्यानंतर नीरव मोदींना देशाला जे सांगायचे आहे ते समोर आले आहे.
अक्षय कुमारचा पॅडमॅन सिनेमा चांगलाच गाजला. त्यातील गाणे 'आज से तेरी सारी गलिया मेरी हो गई' हे देखील लोकप्रिय ठरले. या गाण्याचे पॅरडी सॉन्ग सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. घोटाळ्यानंतर नीरव मोदींचा हा संदेश देशभर फिरवला जात आहे. या गाण्याच्या ओळी अशा आहेत, आज से मेरे सारे खर्चे तेरे हो गए, आज से युएस घर मेरा हो गया... तुम्हीही ऐका ही मजेदार पॅरेडी....
नीरव मोदीने देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या बॅंकेला 11,300 कोटींचा चुना लावला. आता मोदी फरार आहे. देशभरात त्याच्या मालमत्तेवर छापे टाकले जात आहेत. त्याची मालमत्ता जप्त करण्यात येत आहे.
फरार नीरव मोदी न्युयॉर्कमध्ये लपला आहे, असे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तो दुबईत असण्याचीही शक्यता आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, नीरव मोदीच्या कंपनीचे सीईओ विपूल अंबानीला या संपूर्ण घोटाळ्याची माहिती आहे.