Passive income: नोकरीसोबतच 'या' 3 मार्गांनी करा कमाई!; कमी वयात घर, कार घेण्याची इच्छा होईल पूर्ण!

Side Income Along With Salary:  नोकरी करता करता अतिरिक्त पैसे कसे कमवायचे? काम करताना पगारापेक्षा जास्त पैसे कसे कमवायचे?

Pravin Dabholkar | Updated: Sep 10, 2024, 07:28 AM IST
Passive income: नोकरीसोबतच 'या' 3 मार्गांनी करा कमाई!; कमी वयात घर, कार घेण्याची इच्छा होईल पूर्ण! title=
पगारासोबत जादा कमाईचे 3 पर्याय

Passive income Tips: आपल्याकडे खूप पैसे असावेत, आपल्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात आणि ऐशोआरामात आयुष्य जगावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात हे शक्य नसतं. पगाराचा आकडा कितीही मोठा असला तरी महिन्याच्या शेवटी तो अपुराच वाटतो.अशावेळी काहीतरी साईट इनकम असेल तर आपल्या आवडी निवडी आपण पूर्ण करु शकतो. मनाशी ठरवलं तर पैसे कमावणं इतक कठीण काम देखील नाही. पैशाने पैसा बनत जातो असं म्हणतात. अनेक लोक मुख्य कामासोबत काही ना काही कामं करत करतात. तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत कोणताही व्यवसाय करु शकत नाही किंवा इतर कोठेही काम करू शकत नाहीत तर जादा कमाई कशी करायची असा प्रश्न उद्धवतो.पण नोकरी करता करता अतिरिक्त पैसे कसे कमवायचे? काम करताना पगारापेक्षा जास्त पैसे कसे कमवायचे? हे जाणून घेण्यात तुम्हाला स्वारस्य असेल तर 3 महत्वाच्या टीप्स जाणून घेऊया. यामुळे तुमच्या कंपनीला किंवा एचआरला यात कोणतीही अडचण येणार नाही. या 3 पद्धती तुम्हाला पॅसिव्ह उत्पन्न मिळविण्यात मदत करतील.

एंजल इन्व्हेस्टमेंट 

आजच्या काळात स्टार्टअप संस्कृती झपाट्याने वाढतेय. आपल्या ओळखीतील एक ना एकजण तरी स्टार्टअप करतोय, असं आपण ऐकलं असेल. अनेकांकडे स्टार्टअप सुरु करण्यासाठी भांडवल नसते. तुमच्याकडे काही अतिरिक्त पैसे असतील तर ते अशा व्यवसायात गुंतवू शकता. 

स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करतायत, स्टार्टअप किंवा व्यवसायात यशस्वी होऊ शकतात, असे तुम्हाला वाटते. त्यांच्या व्यवसायात पैसे गुंतवून तुम्ही एंजल इन्व्हेस्टमेंट करु शकता. अशा लोकांच्या व्यवसायात पैसे गुंतवून तुम्ही एंजल इन्व्हेस्टर बनून पगाराव्यतिरिक्त अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकता.

मित्र आणि नातेवाईकांना कर्ज

तुमच्या एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला पैशांची गरज असते, त्यासाठी ते बँकेकडे वळतात हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. बॅंकेमध्येदेखील त्यांना व्याज भरावे लागणारच आहे. यासाठी त्यांना बरीच कागदपत्रदेखील द्यावी लागतात. अनेकांचा सीबील चांगला नसल्याने त्यांना बॅंका कर्ज देत नाहीत. पैशांची गरज असलेला हा मित्र किंवा नातेवाईक वेळेवर पूर्ण रक्कम परत करू शकतो, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना कर्ज देऊ शकता आणि त्यावर व्याज मिळवू शकता. हा दोघांसाठी फायदेशीर व्यवहार ठरु शकतो. 

तुम्ही FD मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला यावेळी जास्तीत जास्त 7-8 टक्के व्याज मिळते. पण हीच रक्कम तुम्ही  मित्राला किमान 13-15 टक्के व्याजाने देऊ शकता.समजा तुम्ही त्याला 10-11 टक्के दराने कर्ज दिले तर ते दोघांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क देखील आकारले जाणार नाही.

शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड

जर तुम्हाला स्टॉक मार्केटमची आवड असेल तर पॅसिव्ह इनकमसाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे. तुम्ही थोडासा अभ्यास करुन चांगले शेअर्स निवडू शकता आणि त्यात पैसे गुंतवू शकता. मात्र शेअर बाजारात पैसे गुंतवताना त्यात जोखीमदेखील असते, याचा अंदाज घेऊनच त्यात उतरा. खूपच कमी जोखीम घ्यायची असेल तर तुम्ही म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा पर्याय निवडू शकता. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातून तुम्ही सरासरी 12-13 टक्के परतावा मिळेल. जर तुम्हाला चांगले शेअर्स निवडता आले तर तुम्हाला आणखी नफा मिळू शकतो. म्हणजेच पगारासोबत तुमचे पॅसिव्ह इनकम सुरु राहू शकते.