'पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही'

औषधावरून दिशाभूल केल्यास  कारवाई करणार

Updated: Jul 3, 2020, 01:25 PM IST
'पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही' title=
मुंबई : पतंजलीने  बाजारात आणलेल्या 'कोरोनील' नावाच्या औषधाने कोरोना बरा होत नाही. पतंजलीने या औषधामुळे कोरोना बरा होतो असा जनतेत संभ्रम निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास गृह विभागाच्या मदतीने औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.
 
या औषधामुळे कोरोना बरा होतो असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण करुन त्यांची दिशाभूल  होत आहे. प्रत्यक्षात पतंजली ने तयार केलेले औषध कोरोनील हे अश्वगंधा ,तुळस व गुळवेल वापरून तयार केलेली गोळी (tablet) असून तिचा उपयोग रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होतो. आयुष मंत्रालयाने सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी वरील औषधाची अश्वगंधा, तुळस, गुळवेल हे घटक समाविष्ट असल्याने शिफारस केली आहे.प्रत्यक्षात यामुळे कोरोना बरा होत नाही. ('कोरोनाची साथ नैसर्गिकरित्याच संपेल, अनेकांना लसीची गरजही लागणार नाही') 
 
कोरोनील हे औषधासाठी दिलेले नाव(कोरोना+निल) व प्रसार माध्यमातून होत असलेल्या जाहिराती मुळे जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण होत आहे.कोरोनील चा वापर फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणून केला जाऊ शकतो. या औषधामुळे कोरोना बरा होत नाही याची नोंद जनतेने घ्यावी, असे आवाहन डॉ.  शिंगणे यांनी केले आहे.अरे बापरे... देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

कोरोना व्हायरसच्या Coroanvirus वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आणि साथरोग तज्ज्ञ सुनेत्रा गुप्ता यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाकीत वर्तविले आहे. यामुळे भारताला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सुनेत्रा गुप्ता यांनी 'हिंदुस्थान टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, जगातील अनेक लोकांना कोरोनातून बरे होण्यासाठी लसीचीही गरज पडणार नाही. या आजाराचे स्वरुप साध्या तापाप्रमाणे आहे. त्यामुळे ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि ज्यांना इतर कोणत्याही व्याधी नाहीत, त्यांनी कोरोनामुळे चिंतीत होण्याचे कारण नाही.