PayTM मध्ये सलग दुसऱ्या दिवशी अप्पर सर्किट; काय असेल पुढचे टार्गेट?

PayTM Share News: खालच्या स्तरावरुन रिकव्हरी झाल्यानंतर गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. या शेअरवर ब्रोकरेज फर्मनेदेखील स्टॅटर्जी दिली आहे.

प्रविण दाभोळकर | Updated: Feb 19, 2024, 01:00 PM IST
PayTM मध्ये सलग दुसऱ्या दिवशी अप्पर सर्किट; काय असेल पुढचे टार्गेट?
PayTM Share News

PayTM Share News: पेटीएम शेअरमध्ये 19 फेब्रुवारी रोजी बाजार खुलताच अपर सर्किट लागले आहे. या शेअरमध्ये दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली आहे. विकेंडला कंपनी संबंधित अनेक बातम्या समोर आल्या. याचा परिणाम पेटीएमच्या शेअरवर झालेला दिसून आला. बाजारात होणाऱ्या हालचालींमध्ये शेअर विविध मार्गांनी चर्चेत राहिला.  

Add Zee News as a Preferred Source

पेटीएमचा आयपीओ आल्यानंतर इश्यू प्राइसच्या खाली हा शेअर ट्रेड करत होता. त्यात आरबीआयच्या कारवाईनंतर या शेअरच्या अडचणी आणखी वाढल्या होत्या. दरम्यान आता खालच्या स्तरावरुन रिकव्हरी झाल्यानंतर गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. या शेअरवर ब्रोकरेज फर्मनेदेखील स्टॅटर्जी दिली आहे. 

पेटीएम पेमेंट बॅंकेवेर बंदी घातल्यानंतर पेटीएमचा शेअर सलग खाली आला. यानंतर कंपनीशी संबंधीत ताज्या बातम्या थांबायचे नाव घेत नव्हत्या. त्यानंतर 2 दिवसांमध्ये हा शेअर 10 टक्के वर आलाय. बीएसईवर आज 5 टक्के मजबुतीसह 358.55 रुपये भावावर ट्रेड करत आहे. 16 जानेवारीला स्टॉक 318.35 रुपयाच्या नव्या 52 आठवड्याच्या लो वर गेला होता. 

पेटीएमसंबधी बातम्या 

पेटीएम पेमेंट बॅंकेत डिपॉझिट आणि विड्रॉची मर्यादा 15 मार्चपर्यंत वाढवण्यात येणार आहे. आरबीआयने पेटीएम बॅंकेमध्ये सॅलरी अकाऊंट असेल तर 15 मार्चपर्यंत पर्याय शोधा, असे आरबीआयने सांगितले. तसेच ग्राहकांना पैसे काढण्यास सहाय्य करण्यासही सांगितले. 

कंपनीने नोडल अकाऊंट पेमेंट बॅंक हून अॅक्सिस बॅंकेत शिफ्ट केले. मर्चंट पेमेंट सेटलमेंटसाठी अॅक्सिस बॅंकेसोबत पार्टनरशिप केली आहे. पेटीएम क्यूआर, साऊंडबॉक्स, कार्ड मशीन 15 मार्चनंतरही कार्यरत राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

एफएक्यूतून पेटीएम आणि पेमेंट बॅंकदरम्यान भागीदारी होणार का? याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही. जे डिव्हाइस पेमेंट बॅंकेला लिंक नाही त्यात काही अडचणी नाहीत. कंपनीचे 10 ते 15 टक्के मर्चंट पेटीएम पेमेंट बॅंकेचा वापर करत आहेत. ग्लोबल ब्रोकरेज फर्म सीआटीआयने याबद्दल माहिती दिली आहे. 

ब्रोकरेजने शेअरवर विक्रीचे मत कायम ठेवले आहे. शेअरवर 550 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. सध्या शेअर 358.55 रुपयाच्या किंमतीवर ट्रेड करत आहे. 

(Desclaimer: येथे देण्यात आलेली माहिती ब्रोकरेज हाऊसच्या माहितीद्वारे देण्यात आली आहे. झी 24 तास याच्याशी सहमत असेल असे नाही. गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या) 

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More