पेट्रोल आणि डिझेल पुन्हा एकदा महागलं

पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले

Updated: Sep 13, 2018, 09:09 AM IST
पेट्रोल आणि डिझेल पुन्हा एकदा महागलं

मुंबई : देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सिलसिला सुरुच आहे. दरवाढ थांबण्याचं नावच घेत नाही आहे. पेट्रोल-डिझेलचे दर रोज नवीन नवीन रेकॉर्ड मोडत आहेत. दिल्‍लीमध्ये आज पेट्रोल 13 पैशांनी वाढलं आहे. डीझेल देखील 11 पैशांनी वाढलं आहे. राष्‍ट्रीय राजधानीत पेट्रोल 81 रुपये आणि डिझेल 73.08 रुपये प्रति लीटर झालं आहे. 

आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोल 88.39 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 77.58 रुपये प्रति लीटर झालं आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसल्याने पेट्रोल आणि डिझेल आणखी महागलं आहे. रुपया घसरल्याने आयात महाग झालं आहे. ज्यामुळे इंधनाचे दर वाढत आहेत.