दिल्ली-कोलकाताच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल महाग

 Petrol Price 8 December 2020 Update : आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol and Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. 

Updated: Dec 8, 2020, 11:49 AM IST
दिल्ली-कोलकाताच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल महाग  title=

मुंबई : Petrol Price 8 December 2020 Update : आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol and Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. सलग सहाव्या दिवशी वाढल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर आज कायम तेच आहेत. आज तेल विपणन कंपन्यांनी किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. २० नोव्हेंबरपासून आतापर्यंत तेल कंपन्यांनी सलग १७ वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत.

आजही दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ८३.७१ रुपये आहे, मुंबईत ९०.३४ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर ८५.१९  रुपये आहे तर चेन्नईमध्ये ८६.५१रुपये प्रतिलिटर दर आहे.

चार प्रमुख शहरांमधील पेट्रोलचा दर

शहर               आज          
दिल्ली              ८३.७१       
मुंबई                ९०.३४ 
कोलकाता          ८५.१९    
चेन्नई               ८६.५१  

 पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढतच जातायत, इतर राज्यांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर जास्त असल्याच दिसून आले आहे. पेट्रोल ९०.३४ पैसे तर डिझेल ८०.५१ पैसे इतकं झालय. इतर ४ मेट्रो शहरांच्या तुलनेत पेट्रोल-डिझेलच्या दरात ५ ते १० रुपयांची तफावत आहे. चेन्नई, कोलकाता आणि दिल्लीच्या तुलनेत देशाच्या आर्थिक राजधानीत पेट्रोलचे दर गगनाला भिडलेत.