Petrol-Diesel Price : महागाईचा मोठा भडका, पेट्रोल आणि डिझेल दरात पुन्हा वाढ

Petrol-Diesel Price Today : दिवाळी आधीच महागाईचा भडका उडताना दिसत आहे. सातत्याने पेट्रोल आणि डिझेल दरात (Petrol-Diesel Price) वाढ होत आहे.

Updated: Oct 22, 2021, 12:47 PM IST
Petrol-Diesel Price : महागाईचा मोठा भडका, पेट्रोल आणि डिझेल दरात पुन्हा वाढ

मुंबई : Petrol-Diesel Price Today : दिवाळी आधीच महागाईचा भडका उडताना दिसत आहे. सलग आठवडाभर पेट्रोल आणि डिझेल दरात (Petrol-Diesel Price) वाढ होताना दिसत आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे.  त्यातच आता पेट्रोल आणि डिझेलचे पुन्हा दर वाढले आहेत. 35 पैशांनी ही दरवाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल 112 रुपये 78 पैसे लिटर आहे. तर डिझेल 103 रुपये 63 पैसे आहे. तर दिल्लीतही पेट्रोल 106 रुपये 89 पैसे आणि डिझेल 95 रुपये 62 पैसे झाले आहे. (Petrol-Diesel Price Today: For the first time in India, petrol has reached close to Rs 120 and diesel Rs 110 per liter)

 देशात प्रथमच पेट्रोल 120 आणि डिझेल 110 च्या जवळ  

आज पुन्हा एकदा देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. देशात प्रथमच पेट्रोल 120 आणि डिझेल 110 च्या जवळ पोहोचले आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल 119.05 रुपये आणि डिझेल 109.88 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी नवीन दर जाहीर केले, त्यानुसार आज दिल्लीत पेट्रोलचे दर पुन्हा एकदा 35 पैशांनी वाढले आहेत, तर डिझेल देखील 35 पैशांनी महाग झाले आहे. या महिन्यात ऑक्टोबरमध्ये केवळ 3 दिवस तेलाच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही आणि उर्वरित 11 दिवस ते महाग झाले.

5 सप्टेंबर रोजी दर झाले होते कमी  

दिल्लीत आज पेट्रोल 106.89 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 95.62 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. त्याच वेळी, मुंबईत पेट्रोलची किंमत 112.78 पैसे प्रति लीटर आणि डिझेलची किंमत 103.63 रुपये प्रति लीटर आहे. शेवटच्या वेळी 5 सप्टेंबर रोजी किंमती कमी झाल्या, त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल 15 पैशांनी स्वस्त झाले.

Petrol-Diesel Price 22 October 2021

पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घ्या

तुम्ही तुमच्या घरी बसून SMS द्वारे तुमच्या जवळच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP सोबत सिटी कोड टाकून त्यांच्या मोबाईलवरून 9224992249 वर मेसेज पाठवतील. तुम्हाला इंडियन ऑइल (IOCL) च्या अधिकृत वेबसाइटवर सिटी कोड मिळेल. संदेश पाठवल्यानंतर तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर पाठवले जाईल.