मुंबई : गेल्या चार वर्षांच्या इतिहासात पहिलांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी मोठा उच्चांक गाठलाय. आज एक एप्रिलपासून देशात आर्थिक नव्या आर्थिक वर्षाला सुरवात झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने रविवारी देशभरात उच्चांक गाठला. राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ७३ रुपये ७३ पैशांवर पोहोचले. तर डिझेलचे दर ६४रुपये ५८ पैशांवर पोहोचले आहेत.
नव्या आर्थिक वर्षात कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या महागणार? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले होते. त्याचवेळी खिसा खाली करणारी बातमी धडकलेय. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने आज रविवारी देशभरात उच्चांक गाठला. राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ७३ रुपये ७३ पैशांवर पोहोचले. तर डिझेलचे दर ६४ रुपये ५८ पैशांवर पोहोचले आहेत. मुंबईतही पेट्रोलच्या दराने ८१ रुपयांचा तर डिझेलच्या दराने ६८ रुपयांचा पल्ला ओलांडला आहे.
वर्षभरात मुंबईत पेट्रोलच्या दरात लिटरमागे ९ रुपये तर डिझेलच्या दरात ७ रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी एक एप्रिल रोजी मुंबईत पेट्रोलचे दर लिटरमागे ७२ रुपये ६६ पैसे तर डिझेलचे दर ६१ रुपये २७ पैसे इतके होते. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्या दररोज पेट्रोल व डिझेलच्या दरांचा आढावा घेतात. १४ सप्टेंबर २०१४नंतर पेट्रोलच्या दराने गाठलेला हा मोठा उच्चांक आहे.
चार वर्षापूर्वी पेट्रोलच्या दराने ७६ रुपये ६ पैशांचा पल्ला गाठला होता. तर फेब्रुवारी २०१८ नंतर डिझेलच्या दराने नवा पल्ला गाठलाय. फेब्रुवारीमध्ये दिल्लीत डिझेलचे दर लिटरमागे ६४ रुपये २२ पैसे इतके होते. आता हे दर हेच दर ६४ रुपये ५८पैशांवर पोहोचले आहे.